वीणा मलिकाच्या इंग्रजीची हरभजनने घेतली शाळा


ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकार वीणा मलिक हिची भारतीय संघाचा खेळाडू हरभजन सिंह याने खल्ली उडवली आहे. युनायटेड नेशन जनरल असेंबलीमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्यावर हरभजन सिंहने नाराजी दर्शवत एक ट्विट केले होते. वीणा मलिक हिने हरभजन सिंह याच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले. ज्यामुळे सोशल मीडियावर ती ट्रोल झाली आहे. इम्रान खान यांचे समर्थन करत सोमवारी वीणा मलिकने एक ट्विट केले होते. तिने ज्यात surely या शब्दाच्या जागी surly हा शब्द वापरला होता. यामुळे हरभजन सिंह याने इंग्रजी भाषेवरून वीणा मलिकची खिल्ली उडवली आहे.

इम्रान खान यांनी युनायटेड नेशन जनरल असेंबली येथे केलेल्या वक्तव्यावर हरभजन सिंह यांनी नाराजी दर्शवली होती. ट्विटरच्या माध्यमातून त्यानंतर हरभजन याने आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. दरम्यान, हरभजन म्हणाला होता की, युनायटेड नेशन जनरल असेंबली येथील भाषणात इम्रान खान यांनी अणुबॉम्बची धमकी दिली होती. दोन्ही देशात त्यांच्या विधानाने अधिकच तणाव निर्माण होईल. या दरम्यान ते शांतते संदर्भात विधान करतील असे अपेक्षा होती,असे हरभजन सिंह म्हणाला होता.


वीणा मलिकने यावर आपली प्रतिक्रिया देत एक ट्विट केले होते. तिने यात इम्रान खान यांचे समर्थन करत म्हणाली की, इम्रान खान यांनी आपल्या भाषणात शांततेचा मुद्दा उपस्थित केला होता. पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या भाषणात शांततेबद्दल बोलले आहे. त्या भयानक दृश्याबद्दल त्याने सांगितले आहे, जे कर्फ्यू हटवल्यानंतर नक्कीच दिसेल. त्यांना या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या नाहीत, तुम्हाला इंग्रजी समजत नाही का? असे वीणा मलिक म्हणाल्या होत्या.

परंतु, सोशल मीडियावर हरभजन सिंह याच्या इंग्रजी भाषेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या वीणा मलिकची मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. या ट्विटमध्ये वीणा मलिकने surely या शब्दाच्या जागी surly असा शब्द लिहला आहे. हे हरभजन सिंह याच्या लक्षात आल्यानंतर त्याने वीणा मलिक यांची फिरकी घेतली. हरभजन सिंह यावर म्हणाला की, तुम्हाला काय म्हणायचे आहे? तुमच्या surly या शब्दाचा नेमका अर्थ काय? लो जी देखो ये अंग्रेजी इनकी… तसेच काही लिहण्याअगोदर आधी वाचत जा, असा सल्लाही त्याने वीणा मलिकला दिला आहे.

Leave a Comment