गुगल या गोष्टी सर्च केल्यामुळे तुमचे होऊ शकते मोठे नुकसान


मुंबई : सर्वात मोठे जाएंट इंजिन असलेल्या गुगलचा वापर आपण कुठलीही गोष्ट शोधण्यासाठी, अर्थ समजून घेण्यासाठी करतो. पण गुगलवर आपली ही शोधायची सवय कधी आपल्या अंगलट येऊ शकते. कारण या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर आपण करत असलो तरी आपल्याला गुगल काही स्वतःची माहिती देत नसते. गुगल आपल्यापुढे वेगवेगळ्या वेबसाइटवर असणाऱ्या लिंक्स मांडत असते आणि त्यातील एखादी लिंक आपण उघडून त्यात माहिती शोधतो. पण जर आपण उघडलेली लिंक फसवी निघाली तर? त्यामुळे गुगलवर माहिती शोधताना काळजी घेतली नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज काही टीप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

गुगलचा वापर तुमचे खाते असलेल्या बँकेची वेबसाइट किंवा नेटबँकिंग लिंक शोधण्यासाठी गुगलचा वापर करू नका. ही लिंक किवा वेबसाइट URL तुम्हाला माहिती असेल तर थेट ब्राउजरवर टाइप करा. कारण ऑफिशिअल वेबसाइटच्या ऐवजी तुम्ही चुकीची वेबसाइट उघडलीत तर हॅकर तुमची महत्त्वाची माहिती चोरतील आणि तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

यूजर्सना बिझनेस लिस्टिंग करणारे कधीतरी चुकीचे कस्टमर केअर नंबर किंवा लिंक्स देऊन चुना लावतात. मोठ्या कंपन्यांच्या नावाने फसवणूक झालेल्या घटना घडल्यामुळे गुगलवर कंपन्यांचे नंबर शोधू नका. त्याऐवजी कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाइटवरून त्यांचा नंबर घ्या.

कोणतेही नवे अॅप डाउनलोड करण्याआधी नेमके कोणते ऑफिशिअल व्हर्जन आहे ते माहिती करून घ्या. गुगल प्ले किंवा ऑफिशिअल अॅप स्टोअरचा वापर करूनच नवे अॅप्लिकेशन डाउनलोड करा. एकाच नावाची दुसरी देखील फेक अॅप असतात. ती डाउनलोड केली तर malware किंवा व्हायरस येऊ शकतो.

आजारी पडलात किंवा बरे वाटत नसेल तर डॉक्टरला विचारण्याआधी गुगलवर औषधांची शोधाशोध करण्याची सवय वाईट असून यातून चुकीची माहिती मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यातून औषधे तर गुगलवर शोधून मुळीच घेऊ नका.

गुगलचा वापर करून गुंतवणूकीचे किंवा स्टॉक मार्केटचे अपडेट्स घेत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण यातील ऑथेंटिक सोर्स कोणता हे कळायला गुगलकडे मार्ग नसतो.

बहुतेकदा सरकारी वेबसाइटला हॅकर्स लक्ष्य करतात. काही वैयक्तिक माहिती सरकारी बँका, महापालिका, रुग्णालय या वेबसाइटवर शेअर करताना ती अधिकृत साइट आहे की नाही याची पहिल्यांदा खात्री करून घ्या.

कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अॅक्सेस करताना थेट त्याची URL टाइप करणे कधी योग्य असते. कारण लोकप्रिय सोशल मीडिया साइट्सची अनेक फेक URL असतात. तुम्ही जर तिथे साइन केले तर तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो.

सध्या सणांची धामधूम सुरु असलेल्यामुळे आपल्यापैकी अनेकजण ऑनलाईन शॉपिंगवर भर देतात. पण यात अशा फेक ऑफर देणाऱ्या काही वेबसाइट्स आहेत. गुगलवर दिसणाऱ्या या स्पॅम वेबसाइट्सवरच्या ऑफर्सना भुलून तुम्ही क्लिक केले तर बँकिंगशी संबंधित डेटा तसेच तुमचे पासवर्डसुद्धा लीक होऊ शकतात.

अँटीव्हायरस अॅप किंवा सॉफ्टवेअर गुगलवर सर्च केले तर अनेक पर्याय आपल्याला दिसून येतात. त्यातून ऑथेंटिक अॅप किंवा सॉफ्टवेअर शोधणे खूप कठिण असते. जरी फेक अॅप तुम्ही चुकून डाउनलोड केले तरी मालवेअर तुमच्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरमध्ये घुसण्याची शक्यता असते. एकदा मालवेअर किंवा व्हायरस आला की तुमच्या सिस्टीममधून महत्त्वाची माहिती धोक्यात येईल.

शॉपिंगसाठी तुम्हाला जर कूपन कोड मिळाला असेल तर वापरायला हरकत नाही, पण कूपन कोड जर गुगलवर शोधाल तर पुन्हा एकदा बनावट कूपन देणाऱ्या वेबसाइट्सच्या जाळ्यात अडकाल. तुमचे अकाउंट डिटेल्स डिस्काउंट मिळवण्याच्या नादात हॅक होऊन आर्थिक फटका बसू शकतो.

Leave a Comment