फेसबुकला 2.83 लाख कोटींचा दंड

सोशल मीडिया कंपनी फेसबुकला तब्बल 2.83 लाख कोटी रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर चालवण्यात येणाऱ्या व्हिडीओ जाहिरातींचा कालावधी मोजताना चूक केली आहे. अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने जाहिरातदाराच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे.

2015 ते 2016 मध्ये 18 महिन्यांच्या काळात कंपनीच्या जाहिरातदारांना अधिक पैसे द्यावे लागले आहेत.  याबाबत काही जाहिरातदारांनी 2016 मध्ये कंपनीच्या विरोधात सॅनफ्रांसिस्को येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. जाहिरातदारांचा आरोप आहे की, कंपनीने केवळ तीन सेंकदांपेक्षाच्या अधिक जाहिराती ग्राह्य धरल्या असून, त्याच्या पेक्षा कमी वेळेच्या जाहिराती मोजल्या नाहीत. तसेच आर्टिफिशियल तंत्रज्ञानाचा वापर करून जाहिरातींचा सरासरी वेळ देखील वाढवण्यात आला.

फेसबुकची प्रतिस्पर्धी कंपनी स्नॅपचॅट या प्रकरणात एफटीसीची मदत करत आहे. फेसबुकने आपल्या मालकीच्या इंस्टाग्रामवर स्नॅपचॅटचे अनेक फिचर्स दिले आहेत. याआधी देखील कंपनीला 34 हजार कोटींचा दंड भरावा लागलेला आहे.

 

 

Leave a Comment