अरेच्चा ! एकवर्ष स्मार्टफोन न वापरल्याने मिळणार एवढी रक्कम

जर तुम्हाला वाटत असेल की, स्मार्टफोन हा तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे व त्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. तर तुम्ही चुकीचे आहात. कारण एका 29 वर्षीय महिलेला 1 वर्ष स्मार्टफोनचा वापर न केल्यामुळे तब्बल 72 लाख रूपये मिळणार आहेत.

न्युयॉर्कमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय एलाना मुगदान यांनी एक वर्ष स्मार्टफोनचा वापर केला नाही. त्यांनी स्क्रॉल फ्री फॉर ए इयर चँलेंजमध्ये भाग घेतला होता. या दरम्यान त्यांनी एकदाही स्मार्टफोनचा वापर केला नाही. एलानाकडे याआधी आयफोन 5एस होता. तिने स्मार्टफोनचा वापर केला नसला तरी, तिने याकाळात फिचरफोनचा वापर केला.

स्क्रॉल फ्री फॉर ए इयर चँलेंज जिंकल्यानंतर एलानाला 1 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 72 लाख रूपये मिळतील. मात्र यासाठी तिला लाई डिटेक्शन टेस्ट द्यावी लागेल. त्यानंतरच तिला ही रक्कम मिळेल.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये विटामिन वॉटरने एका स्पर्धेचे आयोजन केले होते. जेणेकरून लोकांची स्मार्टफोन वापरण्याची सवय सुटेल. विटामिन वॉटरने म्हटले होते की, जर तुम्ही 365 दिवस स्मार्टफोनचा वापर केला नाही तर तुम्हाला 1 लाख डॉलर बक्षीस म्हणून दिले जातील.

या स्पर्धेत भाग घेण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2019 होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांना #nophoneforayear आणि #contest वापरून ट्विट करायचे होते व इंस्टाग्रामवर देखील पोस्ट करायचे होते.

Leave a Comment