दसऱ्याच्या मुहर्तावर भारतात होणार दाखल पहिले राफेल

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज दसऱ्याच्या शुभमुहर्तावर फ्रांसची राजधानी पॅरिसमध्ये शस्त्रपुजन करणार आहेत. शस्त्रपुजा केल्यानंतर राजनाथ सिंह फ्रांसच्या दसॉ कंपनीकडून अधिकृतरित्या लढाऊ विमान राफेल अधिग्रहण करतील आणि विमानातून उड्डाण देखील घेतील.

दसॉबरोबर झालेल्या करारात विजयादशमीच्या मुहर्तावर वायुदलाच्या ताफ्यात 36 राफेल विमान सहभागी होतील.

राफेल संबंधित महत्त्वाची माहिती –

आजच्याच दिवशी रामाने लंकेचा राजा रावणावर विजय मिळवला होता. त्यामुळे विजयादशमीला आसुरांवर देवतांच्या विजयाचे प्रतिक समजले जाते. शस्त्रपुजेच्या निमित्ताने लढाऊ राफेल विमान खरेदी केल्याने इतर शत्रू राष्ट्रांना देखील संदेश जाईल. हे विमान सैन्यदलात महत्त्वाची भूमिका बजावेल.

राफेल वायदुलात सहभागी झाल्यास वायुदलाची ताकद आणखीन वाढेल. तसेच यामुळे पाकिस्तानची देखील आपल्याकडे डोळे वर करून बघण्याची हिंमत होणार नाही. पाकिस्तानकडे राफेलच्या क्षमतेचा सामना करण्यासारखे एकही विमान नाही.

सेवानिवृत्त एअर मार्शल एम. मथेश्वरण यांनी सांगितले की, पाकिस्तानकडे मल्टी रोल विमान एफ-16 आहे. हे विमान भारताच्या मिराज-2000 सारखेच आहे. पाकिस्तानकडे राफेलसारखे एकही विमान नाही.

फ्रांस, इस्त्रायल आणि कतारनंतर राफेल विमान असणारा भारत चौथा देश असेल. राफेल हे 5 व्या पिढीचे विमान असून, यामध्ये रडारपासून वाचण्याची देखील क्षमता आहे. यामुळे वायदुलात मोठे बदल होतील, कारण भारताकडे आतापर्यंत मिराज-2000 आणि सुखाई-30 एमकेआय हे तिसऱ्या आणि चौथ्या पिढीची विमानं आहेत.

राजनाथ सिंह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रोन यांची भेट घेतील व बोर्डोक्समधून पहिले राफेल विमान प्राप्त करतील.

पॅरिसमध्ये पोहचल्यावर राजनाथ सिंह यांनी ट्विट केले होते की, फ्रान्सला येऊन आनंद झाला. फ्रान्समधील माझ्या दौऱ्याचे लक्ष्य हे दोन्ही देशांमधील भागीदारीचा विस्तार करणे हे आहे.

भारताने जवळपास 59 हजार कोटी रूपयांमध्ये 36 राफेल विमान खरेदी केली आहेत. 2016 मध्ये हा करार करण्यात आला होता. सर्व 36 राफेल विमान भारताला 2022 पर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment