सोशल मीडियाद्वारे केली जात आहे कर्मचाऱ्यांची भरती

इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या काळात नोकऱ्या देण्याची पध्दत देखील बदलली आहे. अनेक कंपन्या इंस्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया साईट्सचा वापर करून कर्मचाऱ्यांची भरती करत आहे. त्यामुळे कंपन्यांना चांगले उमेदवार शोधण्यासाठी जाहिरात देण्याची गरज पडत नाही. जाहिरातीसाठी पैसे खर्च करण्याऐवजी कंपन्या तरूणांचे सोशल मीडिया अकाउंट तपासत आहे.

इंफोसिस, एक्सेंचर, आयबीएम आणि विप्रो सारख्या आयटी कंपन्याचे ट्विटरवर लाखो फॉलोवर्स आहेत. इंस्टाग्रामवर देखील या कंपन्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत. आयबीएमने याच वर्षी इंस्टाग्रामवर लाइफएट आयबीएम नावाचे अकाउंट सुरू केले आहे. यावर कर्मचारी आपल्या जॉबबद्दल आणि कंपनीच्या वातावरणाबद्दल मजेशीर पोस्ट टाकतात. अकाउंटवर दिलेल्या लिंकवर जाऊन नोकरी शोधणारे आपला सीव्ही पाठवू शकतात. याचप्रमाणे एक्सेंचरचे इंस्टाग्रामवरील करिअर अकाउंटला 40 हजार फॉलोवर्स आहेत.

स्टॅटिस्टाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, देशभरातील 6.9 कोटी लोक इंस्टाग्रामचा वापर करतात. हे आकडे 2019 चे असून, यातील बहुतांश 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. कंपन्या याच वयाच्या युवकांना नोकऱ्या देत आहेत. कंपन्या युवकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष देखील ठेवतात. डिलिव्हरी कंपनी डुजोचे हेड साई गणेश यांच्यानुसार, 80 टक्के रिज्युमे हे सोशल मीडिया पोस्टद्वारेच येतात.

पब्लिक रिलेशन, कंटेंट रायटिंग, फोटोग्राफी, फॅशन आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या लोकांना सोशल मीडियावर शोधणे सोपे आहे. क्रिएटिव्ह लोक सोशल मीडियावर सहज सापडतात.

 

Leave a Comment