केवळ 45 हजारात खरेदी करू शकता रॉयल एनफिल्डच्या बाईक्स

रॉयल एनफिल्डच्या गाड्यांची सध्या बाजारात चलती आहे. रॉयल एनफिल्डच्या बाईक्स चालवणे प्रत्येकालाच आवडते. मात्र किंमत जास्त असल्याने प्रत्येक जण ही गाडी खरेदी करू शकेलच असे नाही. मात्र सेंकड हँड बाजारात थोडे सर्च केले तर या कंपनीचे चांगले मॉडेल मिळू शकते.

(Source)

जर तुम्ही सेंकड हँड गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्ही दिल्लीतील करोल बाग, लाजपत नगर, पुष्पा भवन या ठिकाणी जाऊ शकता. येथे तुम्हाला अनेक पर्याय सापडतील. तुम्ही ओएलएक्स, क्यूकर या ठिकाणी देखील ऑनलाईन सर्च करू शकता.  आम्ही तुम्हाला रॉयल एनफिल्डच्या काही मॉडेल्सबद्दल सांगत आहोत, जे सेंकड हँड बाजारात 45 हजारांमध्ये तुम्हाला मिळू शकेल. 2016 -17 चे मॉडेल्स 5 ते 10 हजार किमी चाललेल्या बाईक्स 45 ते 65 हजारांच्यामध्ये सहज मिळतात.

(Source)

जर तुम्ही ऑनलाइन बाईक बघत असाल तर केवळ फोटो बघून खरेदी करण्याचा विचार करू नका. स्वतः जाऊन बाईक बघा व चेक केल्यानंतरच खरेदी करा.

याच बरोबर प्रायव्हेट सेलर अथवा डीलरकडून गाडीची कागदपत्रे मागण्यास विसरू नका. बाईक चोरीची तर नाही, किंवा कोणत्याही अपघाताच्या प्रकरणात तर अडकलेली नाही हे नक्की तपासा.

बाईकचे सर्व पार्ट्स योग्यरित्या काम करतात की नाही हे देखील तपासा. तसेच, गाडीची किंमत कमी करण्यास विसरू नये. किंमत कमी करण्याचा नक्की प्रयत्न करावा. सेंकड हँड बाजारात देखील योग्यरित्या तपासून गाडी खरेदी केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

 

 

Leave a Comment