भारतात लाँच झाली बीएमडब्ल्यूची M5 Competition


भारतीय बाजारपेठे सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय कार कंपन्यांपैकी एक असलेल्या बीएमडब्ल्यूने नवीन बीएमडब्ल्यू M5 कार भारतात लाँच केली आहे. भारतात ही कार कंप्लीटली बिल्ट युनिट (CBU) म्हणून लाँच झाली आहे. या कारची भारतात एक्स-शोरुम किंमत तब्बल 1.55 कोटी रुपये आहे. स्टॅण्डर्ड बीएमडब्ल्यू5 मध्ये असलेले इंजिन या कारमध्ये वापरण्यात आले आहे. 4.4 लीटर ट्वीन टर्बो V8 मोटार या कारमध्ये देण्यात आली आहे. हे मोटार 616 bhp पॉवर आणि 750Nm टॉर्क जनरेट करते.

8 स्पीड M स्टेपट्रॉनिक ट्रान्समिशन बीएमडब्ल्यू M5 Competition मध्ये देण्यात आले आहे. 3.3 सेकंदात ही कार 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग धरु शकते. स्टॅण्डर्ड M5 100 किमी प्रति तासाचा वेग धरण्यासाठी 3.9 सेकंदाचा वेळ घेते. M5 प्रमाणेच या कारमध्येही M xDrive ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टम देण्यात आला आहे. कारमध्ये DSC आणि xDrive मोड्स देण्यात आल्यामुळे ड्रायव्हरला 4WD, 4WD Sport आणि 2WD मोडमधून एक मोड निवडण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.

M5 Competition दिसायला तिच्या स्टॅण्डर्ड व्हर्जन सारखीच आहे. काही नवे फीचर्सही या एडिशनमध्ये देण्यात आहेत. या व्हर्जनमध्ये रेडिएटर ग्रील, विंग मिरर, रिअर अप्रॉन, रिअर स्पॉयलर देण्यात आले आहेत. या कारचं रुफ हे लाईटवेट आहे, यासाठी हाय टेन्साईल कार्बन फायबर प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. बीएमडब्ल्यू M5 Competition ही स्टॅण्डर्ड बीएमडब्ल्यू M5 व्हेरिएंटच्या तुलनेत 10 लाख रुपयांनी महाग आहे. याची भारतातील किंमत 1.44 कोटी रुपये आहे.

Leave a Comment