ही वेबसाइट मिटवले तुमची रक्त मिळवण्याची चिंता

blood
नवी दिल्ली – बऱ्याच वेळा आजारी किंवा अपघातग्रस्त व्यक्तीला रक्ताची किंवा प्लेटलेट्सची आवश्यकता असते. पण त्यावेळी त्याची खूप धांदल उडते. आधीच आपल्या आप्तस्वकीयाच्या आजाराने तो दु:खी असतो. अशावेळी रक्त मिळवण्यासाठी त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. कधी रक्तगट जुळून येत नाही तर कधी रक्ताची उपलब्धता नसते. अशावेळी रक्त मिळवण्यासाठी महत्प्रयास करावे लागतात.

डेंगूने सध्या देशात थैमान घातले असून अशा डेंगूच्या रुग्णांसाठी प्लेटलेट्सची खूप आवश्यकता असते. पण आता अशा रुग्णांच्या मदतीसाठी आता समोर आली आहे. कुणालाही रक्त किंवा प्लेटलेट्सची आवश्याकता असेल तर या www.friends2support.org वेबसाइटला भेट द्या. या वेबसाइटवर भारत, येमन, नेपाल, श्रीलंका, बांग्लादेशच्या स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांची फोन नंबरसह यादी उपलब्ध आहे.

www.friends2support.org या वेबसाइटला आपण भेट दिली, तर तुम्हाला हवा असलेला रक्तगट, नंतर देश, राज्य, जिल्हा आणि त्यातही तुम्ही ज्या भागात असाल तो निवडून त्यावरील सबमिटचे बटन दाबला. तुम्हाला तुमच्या जवळच्या भागातील अनेक स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे नाव, पत्ता आणि मोबाइल नंबर मिळतील. त्याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवे असलेल्या रक्तदात्याशी संपर्क साधून लवकरात लवकर रक्त मिळवू शकता.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment