गणित-भाषेत हुशार होण्यासाठी मनसोक्त झोपा!

maths
कॅनडा : एका संशोधनात चांगल्या झोपेशी गणित आणि भाषा यांतील उत्तम कामगिरीचा संबंध असल्याचे दिसले असून जी मुले रात्री चांगली झोप घेतात, त्यांची या दोन्ही विषयांतील कामगिरी चांगली असते.

अंथरूणात घालवलेला एकूण वेळ आणि प्रत्यक्षात घेतलेली झोप यांचे गुणोत्तर म्हणजे ‘झोपेची कार्यक्षमता’ . ज्या मुलांचे हे गुणोत्तर चांगले होते, त्यांचे गणित आणि भाषा हे विषय चांगले असल्याचे अभ्यासात दिसून आले. विज्ञान आणि कला या विषयांत मात्र काहीही फरक पडत नसल्याचे दिसून आले. कॅनडातील डग्लस मेंटल हेल्थ युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट येथील रियूट ग्रूबर यांनी हा अभ्यास केला आहे.

Leave a Comment