आता कुत्र्यांसाठीही अनोखी ‘सेल्फी स्टिक’

poochselfie

न्यूयॉर्क: आपल्या पाळीव कुत्र्यांचे लाड करणारी माणसे आपल्या आजूबाजूला अनेकदा बघायला मिळतात. त्यात कुत्र्यांना कपडे, टोप्या अगदी मोजे सुद्धा घालून ‘फॅशन शो’मध्ये भाग घेणारेही कमी नाहीत.

अशा श्वानप्रेमी लोकांसाठी आणि आपल्या ‘पपी’ला सजवून त्याचे फोटो आपल्या ‘फेसबुक’वर टाकण्याची आवड असणाऱ्या लोकांसाठी एक खुशखबर आहे. आपल्या कुत्र्याच्या फोटो काढताना त्याने अगदी ‘पोज’ दिल्यासारखे शांत आणि स्थिर रहावे; यासाठी ‘किक स्टार्टर’ या कंपनीने एक अनोखे उपकरण बाजारात आणले आहे. त्याचे नाव ‘पूछसेल्फी’! उपकरण अगदी साधे आहे. मात्र ते तितकेच प्रभावी आणि उपयुक्तही असल्याचा कंपनीचा दावा आहे.

हे ‘पूछसेल्फी’ म्हणजे एक सेल्फीस्टिक आहे; जी आपल्या कुत्र्याचे फोटो काढताना आपल्या सेलफोनवर बसवायची आहे. त्याच्यावर एक सुशोभित केलेला टेनिस बॉल बसविलेला असतो. कंपनीचा दावा आहे की; सर्वसाधारणपणे कुत्र्यांना टेनिस बॉल आवडतो. त्यामुळे तुम्ही त्याचे फोटो काढत असताना या बॉलकडे एकटक बघत रहातो. तेवढ्या वेळात तुम्हाला त्याचा फोटो काढता येतो.

ही खबर जशी श्वानप्रेमीसाठी आनंदाची आहे; तशीच ती श्वान आणि श्वानप्रेमी यांचा मनापासून तिरस्कार करणाऱ्यांसाठीही आनंदाचीच आहे. कारण या नव्या ‘खुळा’ची मनसोक्त टिंगल करण्याची संधी या निमित्ताने या लोकांना मिळणार आहे.

——————————————-

Leave a Comment