अल्झायमरचे निदान आवाजावरून

alzhamire
अल्झायमर आणि पार्किंसन्स डिसिज यांच्यावर उपाय सापडलेला नाही आणि हे विकार नेमके आधी ओळखता येत नाहीत. त्यामुळे या रोगांची पूर्वसूचना हे एक वैद्यकीय शास्त्रापुढचे आव्हान ठरलेले आहे. अर्थात असे ते आव्हान असले तरी त्यांचे निदान कसे करता येईल यावर संशोधन जारी आहे. अमेरिकेत स्थायिक असलेल्या एका भारतीय शास्त्रज्ञाने अल्झायमरची पूर्वकल्पना आवाजावरून येऊ शकेल काय यावर संशोधन आणि तशी पूर्वकल्पना येऊ शकेल असा विश्‍वास त्यांना वाटायला लागला आहे.

एखादी व्यक्ती फोनवरून आपल्याशी बोलत असेल तर त्याच्या बोलण्यात काही विशिष्ट बदल जाणवतात. शेवटी अल्झायमर आणि पार्किसन्स डिसिज हे विकार मेंदूतल्या बदलामुळेच होत असतात. माणसाला काय बोलावे आणि कसे बोलावे याचे आदेश मेंदूकडूनच येत असतात. तेव्हा या दोन विकारांना एखादी व्यक्ती बळी पडणार असेल तर त्याच्या मेंदूकडून मिळणार्‍या सिग्नलमध्ये काही बदल जाणवतात आणि हेच बदल बोलण्यात प्रतिबिंबित होतात.

या दोन विकारांची पूर्वकल्पना येण्याच्या दृष्टीने आणि आणखीही काही गोष्टी उपयुक्त ठरू शकतात असे शास्त्रज्ञांना वाटते. रक्ताच्या तपासणीतून आणि रक्ताच्या विविध घटकांच्या प्रमाणाच्या अंदाजावरूनसुध्दा हे दोन विकार आधीच जाणून घेता येऊ शकतात. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी २७ हजार रुग्णांवर प्रयोग करून या संबंधात काही निष्कर्ष काढले आहेत. त्यासाठी जगभरातल्या रुग्णांशी संपर्क साधला गेला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment