भारतात लवकरच दाखल होणार टोयोटाची ही लग्झरी एमपीव्ही

जापानची ऑटोमोबाईल कंपनी टोयोटा या महिन्यात भारतात लग्झरी एमपीव्ही वेलफायर लाँच करणार आहे. कंपनीकडून अद्याप लाँचिंगची तारीख सांगण्यात आलेली नाही. भारतात या एमपीव्हीची किंमत 70 ते 75 लाख रूपये असण्याची शक्यता आहे. मर्सिडीज बेंझच्या व्ही-क्लासला ही कार टक्कर देईल. मर्सिंडीज बेंझच्या व्ही-क्लासची सुरूवातीची किंमत 68.4 लाख रूपये आहे.

(Source)

लूकबद्दल सांगायचे तर या प्रीमियम एमपीव्हीमध्ये एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स बरोबर स्प्लिट हेडलँम्प्स आणि जाड क्रोम पट्टीसोबत क्रोम ग्रिल देण्यात आली आहे. एमपीव्हीमध्ये मोठा एयरडॅम आहे. तसेच, इंटीग्रेटेड टर्न सिग्नल्स सोबत आउट साईड रियर व्यू मिरर्स आहेत.

(Source)

या एमपीव्हीचे इंटेरियर काळ्या रंगाचे आहे. डॅशबोर्डवर फॉक्स वूड फिनिशिंग मिळेल. सेंटर कंसोलच्या चारही बाजूंना सिल्वर फिनिशिंग देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि एसी मॉड्यूल आहे. याचबरोबर लेदर-वुडन फिनिश मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आणि ट्विन-पॉड इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे.

(Source)

याशिवाय या लग्झरी एमपीव्हीमध्ये वेंटिलेटेड आणि हीटेड सीट्स मिळतील, ज्यात मेमरी आणि रेक्लाइनिंगची सुविधा मिळेल. याचबरोबर यात लेदर अपहोल्स्ट्री, पॉवर साईड आणि रिअर डोर, ट्विन मोनोरूफ, सनशेड्स, ऐम्बिएंट लाइटिंग, सीट टेबल्स, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, पर्सनल स्पॉट लाइट्स आणि 7-एयरबॅग्स असे फिचर्स मिळतील.

भारतात टोयोटो वेलफायर 2.5 लिटर पेट्रोल हायब्रिड इंजिनसोबत लाँच करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment