टाटाच्या या कार्सवर मिळत आहे एवढ्या लाखांची सूट

जर तुम्ही यंदा सणांच्या काळात गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मंदीच्या काळात गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी अनेक कंपन्या कारवर ऑफर्स देत आहेत. टाटाच्या कारवर 1.65 लाखांपर्यंतची ऑफर दिली जात आहे. या कॅम्पेनला टाटा मोटर्सने ‘फेस्टिवल ऑफ कार’ असे नाव दिले आहे.

(Source)

हेक्सावर 1.65 लाखांची सूट – 

टाटाच्या हेक्सा, नेक्सॉन, टियागो, टियागो NRG, हॅरियर आणि टिगोर या कारवर फेस्टिव सिझनमध्ये सुट मिळत आहे. कंपनीकडून सर्वाधिक सुट HEXA वर 1.65 लाख रूपये की देण्यात येत आहे. हेक्सालर 50 हजार रुपये कॅश ऑफर, 35 हजार रुपये एक्सचेंज ऑफर, 15 हजार रूपये कॉर्पोरेट ऑफर, 50 हजार रुपये ठराविक स्टॉक ऑफर आणि 15 हजार रूपयांची ठराविक मुदत ऑफर देण्यात येत आहे.

(Source)

नेक्सॉनवर 90,500 रूपयांची सूट – 

टाटाच्या नेक्सॉनवर 25 हजार रूपये कॅश ऑफर, 25 हजार रूपये एक्सचेंज ऑफर, 7500 रूपये कॉर्पोरेट ऑफर, 30 हजार रूपये ठराविक स्टॉक ऑफर आणि 8 ऑक्टोंबरच्या आधी खरेदीवर 1 ग्रॅम सोन्याचे नाणे देण्यात येत आहे.

(Source)

टाटा टिआगोवर 79 हजारांची सूट – 

जर तुम्ही कॉम्पॅक्ट कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फेस्टिव सिझनमध्ये टाटा Tiago खरेदी करू शकता. टिआगोवर 25 हजार रूपये कॅश ऑफर, 15 हजार रूपये एक्सचेंज ऑफर, 5000 रुपये कॉर्पोरेट ऑफर आणि 25 हजार रूपये ठराविक स्टॉकवर ऑफर मिळत आहे. याचबरोबर 8 ऑक्टोंबरच्या आधी खरेदीवर 3 ग्रॅम सोन्याचे नाणे देण्यात येत आहे.

(Source)

टाटा Tigor वर 1,20,000 रुपयांची सूट –

या फेस्टिव सिझनमध्ये टाटाच्या टिगोरवर एकूण 1 लाख 20 हजार रूपये सूट मिळत आहे. टिगोरवर 30 हजार रुपये कॅश ऑफर, 25 हजार रूपये एक्सचेंज ऑफर, 12000 रुपये कॉर्पोरेट ऑफर आणि 50 हजार रुपये निवडक स्टॉक ऑफर मिळत आहे. याचबरोबर 8 ऑक्टोंबरच्या आधी खरेदीवर 1 ग्रॅम सोन्याचे नाणे देण्यात येत आहे.

(Source)

टाटा हॅरियरवर 65 हजारांची सूट –

टाटा कंपनीने लोकप्रिय कार हॅरियरवर 65 हजारांची डिस्काउंट ऑफर दिली आहे. जानेवारीमध्ये लाँच झालेल्या या कारवर आतापर्यंत सर्वाधिक डिस्काउंट मिळत आहे. टाटा हॅरियरची दिल्लीमधील एक्स-शोरूम किंमत 13.02 लाख रूपये आहे.

हॅरियरवर 35,000 रूपयांची एक्सचेंज बोनस ऑफर देण्यात येत आहे, त्याचबरोबर 15,000 रूपयांचे कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. कंपनी कारवर 15,000 रूपयांचे अतिरिक्त एक्सचेंड डिस्काउंट देखील देत आहे. याप्रकारे हॅरियवर तुम्हाला 65 हजारापर्यंतचे डिस्काउंट मिळेल.

Leave a Comment