सोशल मीडियावर सर्वसामान्य व्यक्ती पडले कंटेटच्या कंपन्यांवर भारी

आजच्या काळात सोशल मीडिया न वापरणारा एखादाच सापडेल. आपण दररोज फोटो-व्हिडीओसारखे अनेक कंटेट सोशल मीडियावर शेअर करत असतो. एकप्रकारे सोशल मीडिया सर्वसामान्य युजर्समुळेच सुरू आहे. असे यासाठी की, सोशल मीडियावर 79 टक्के कंटेट हे सर्वसामान्य युजर्सच तयार करत आहेत. 2013 मध्ये हा आकडा केवळ 8 टक्के होता.

सोशल मीडियावर कंटेट पोस्ट होण्याचा आकडा ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीच्या इंटरनेट इंस्टिट्यूटने जारी केला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, फेसबुक, हेल्लो, टिकटॉक, ट्विटर आणि व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जे कंटेट तुम्ही बघता त्यातील 79 टक्के कंटेट सर्वसामान्य लोकांद्वारे तयार करण्यात आलेला असतो. इतर कंटेट एखाद्या कंपनी अथवा संघटित क्षेत्राकडून तयार करण्यात येतो.

(Source)

युनिवर्सिटीच्या रिपोर्टनुसार, ब्लॉगर्सची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यावर अभ्यास करणारे ग्रांट बँलेंड आणि विलियम एच डुटन यांनी सांगितले की, 69 टक्के इंटरनेट युजर्स सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत आहेत. तर केवळ 14 टक्के लोक हे सोशल मीडियावर लिहित आहेत.

(Source)

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 2013 मध्ये ही संख्या 59 टक्के होती. तर आता वाढून 83 टक्के झाली आहे. ऑनलाइन चित्रपट आणि टिव्ही शो बघणाऱ्यांची संख्या देखील वाढली असून, इंटरनेटवर चित्रपट आणि शो बघणाऱ्यांची संख्या 72 टक्के आहे.

Leave a Comment