रेमो डिसूझा तिसऱ्यांदा झाला विवाहबद्ध


कोरिओग्राफर रेमो डिसूझाने आपल्या नृत्याच्या ताकदीवर हिंदी कलाविश्वात वेगळे विश्व आणि ओळख प्रस्थापित केले. तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकत भारतीय चित्रपटसृष्टीत विविध नृत्याविष्कार सादर करणाऱ्या रेमोने सर्वांना धक्काच दिला आहे.

बसला ना जोर का झटका… आता तुम्ही विचार करत असाल की रेमोची तिसरी पत्नी नेमकी कोण असेल ? आता आपल्यापैकी अनेकांनी आपली डोकी चालवायला सुरुवात नक्कीच केली असतील. पण जास्त डोके चालवू नका कारण रेमो आपल्या पहिल्याच पत्नी बरोबर तिसऱ्यांदा विवाह केला आहे.

रेमोने आपल्या लग्नाच्या २० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्नी लिजेल हिला तिसऱ्यांदा आयुष्यभरासाठी साथ देण्याचे वचन दिलं आहे. ज्यानंतर मोठ्या खोडकर अंदाजात अभिनेता वरुण धवन याने त्याची खिल्लीडी उडवली.

रेमोनेही सोशल मीडियावर खुद्द या खास विवाहसोहळ्याचे फोटो शेअर केले. यावेळी त्या दोघांचाही अंदाज सर्वांची मने जिंकून गेला. या सोहळ्यात साग्रसंगीत विवाहसोहळ्याप्रमाणेच सारा थाट पाहता आला.

Leave a Comment