प्रियंका हवे आहे मातृत्व


अमेरिकन गायक निक जोनासशी विवाहबद्ध झाल्यानंतर अवघ्या काहीच महिन्यात अभिनेत्री प्रियंका चोप्रा गर्भवती असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनी यावर प्रियंका गर्भवती नसल्याचे स्पष्टीकरणही दिले होते. पण आपल्याला आई व्हायचे असल्याचे आता चक्क प्रियंकानेच सांगितले आहे. तिने ही इच्छा काही दिवसापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त करुन दाखवली.

प्रियंकाने तिच्या काही इच्छांचा खुलासा झालेल्या मुलाखतीमध्ये केला. तिला यामध्ये आई व्हायचे आहे, घर खरेदी करायचे आहे. या आणि अशा अनेक इच्छा असल्याचे सांगितले. माझ्या काही इच्छा- आकांक्षा आहेत. खर तर या गोष्टींविषयी मी आधी फारसा विचार केला नव्हता. पण आता करत असून मला आई होण्याची इच्छा आहे. त्यासोबतच मला एक घरदेखील खरेदी करायचे आहे. मी गेल्या कित्येक वर्षांमध्ये घर घेण्याचा विचार केला नव्हता. फक्त बॅग घ्यायचे आणि इथून-तिथून फक्त प्रवासच करायचे, असे प्रियंकाने सांगितले.

त्या मुलाखतीत ती म्हणते, एखादी गोष्ट मी ठरवली की ती पूर्णत्वास नेते. पण एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी काही गोष्टींचा त्यागही करावा लागतो. कोणतीच गोष्ट या जगात सहज आणि फुकट मिळत नाही. मेहनत, निश्चय आणि त्याग या गोष्टींचा अवलंब केला की आपल्याला हवी असलेली गोष्ट नक्कीच मिळते. त्यामुळे मला या गोष्टींची कधीच भीती वाटत नाही.

Leave a Comment