१५ ऑक्टोबरपर्यंत रद्द केल्या प्रगती एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस


मुंबई : लांब पल्ल्याच्या २२ गाड्यांवर मध्य रेल्वेने हाती घेतलेल्या काही दुरुस्तीच्या कामामुळे परिणाम होणार असल्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पुरते कोलमडणार आहे. तर १५ ऑक्टोबरपर्यंत प्रगती एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस या प्रमुख दोन गाड्या बंद राहणार आहेत. दरम्यान, पुण्यात कोयना एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे. देखभाल-दुरुस्तीचे काम मुंबई – पुणे घाटात करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

लोणावळा परिसरात ऑगस्ट महिन्यातील मुसळधार पावसाळामुळे दरड कोसळून १४ दिवस मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद होती. या मार्गावरील वाहतूक दरड हटवल्यानंतर सुरु झाली. यामुळे आगामी १० दिवस रेल्वे वाहतूकीवर परिणाम होणार असल्याने पुन्हा एकदा खासगी बसची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

पाच ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या काळात दक्षिण-पूर्व घाटातील मंकी घाट आणि कर्जत परिसरात अप मार्गावर पायाभूत सुविधासाठी कामे करण्यात येत असल्यामुळे आगामी दहा दिवस काही लांबपल्ल्यांच्या एक्स्पेस रद्द करण्यात येणार आहेत. काही गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत.

Leave a Comment