जाणून घ्या रावणाबद्दल अशा काही गोष्टी ज्या फारशा कोणाला माहीत नाहीत


उद्या संपूर्ण देशभरात विजयादशमीचा सण साजरा करण्यात येणार असून हिंदू धर्मानुसार याच दिवशी रावणाचा रामाने वध केला होता. दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. पण रावणाशी निगडीत काही अशाही गोष्टी आहेत ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत. दंत कथेत असे म्हटले जाते की, रावण हा दशानन होता. पण यात खरच काही तथ्य आहे हा?

काही लोकांच्यामते, रावण हा दशानन नव्हता. पण त्याला लोक दशानन म्हणायचे त्यामुळे रावण त्याला 10 तोंडे असल्याचा भ्रम निर्माण करू शकत होता. जैन शास्त्रात उल्लेख केल्यानुसार, रावणाच्या गळ्यात मोठे असे नऊ गोलाकार मणी असायचे. त्या नऊ मण्यांमध्ये त्याचे डोके दिसायचे ज्यामुळे त्याला 10 डोके असल्याचा भ्रम तयार झाला होता.

मान्यतांनुसार, रावणाने मेघनाथच्या जन्माच्याआधी ग्रह- नक्षत्रांना स्वतःच्या हिशोबाने सजवले होते. यामागचे मुख्य कारण हे त्याचा मुलगा अमर व्हावा हे होते. पण शनीने अगदी शेवटच्या क्षणी आपली चाल बदलली. रावण एवढा शक्तीशाली होता की त्याने शनीला त्याच्याकडे बंदी म्हणून ठेवले होते.

वेद आणि संस्कृतचे रावणाला उत्तम ज्ञान होते. साम वेदात तो निपुण होता. असे म्हटले जाते की त्याने शिवतांडव, युद्धीशा संत्र आणि प्रकुठा कामधेनुसारख्या कृतींची रचना केली. सामवेदाशिवाय त्याला इतर तीन वेदांचेही ज्ञान होते. याशिवाय रावणाला संगीताचीही आवड होती. रुद्र वीणा वाजवण्यात रावणाचा हात कोणीही धरू शकत नव्हता. रावण जेव्हाही अस्वस्थ व्हायचा तो रुद्र वीणा वाजवायचा असे म्हटले जाते.

Leave a Comment