या तारखेला लाँच होणार जावाच्या तीन भन्नाट मोटार सायक्लस

जावा मोटारसाईकल्स कंपनीने मागील वर्षी भारतीय बाजारात एंट्री केली होती. सध्या कंपन्याच्या जावा आणि जावा 42 या दोन बाईक्स बाजारात उपलब्ध आहेत. जावा बाईक्सला महिद्राची मालकी असलेली क्लासिक लेजंड्स ही कंपनी बनवते. कंपनी आपला भारतीय बाजारातील पहिला वर्धापन दिन साजरा करण्याच्या तयारीत आहे. यानिमित्ताने कंपनीने काही खास बाईक्सबद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे.

(Source)

जावा ब्रँडचे सीईओ अशीष जोशी यांनी म्हटले आहे की, कंपनीची योजना 3 नवीन बाईक्स लाँच करण्याची आहे. या तिन्ही बाईक्स वेगवेगळ्या इंजिन आणि वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. या बाईक्सचे लाँचिंग पुढील 18 महिन्यात होईल. या तिन्ही बाईक्सबद्दलची माहिती आणि फिचर्स कंपनीच्या पहिल्या वर्धापन दिना दिवशी 15 नोव्हेंबरला सांगण्यात येईल.

(Source)

क्लासिक लेजंड्सने मागील वर्षी 15 नोव्हेंबरला जावा बाईक्सच्या लाँचिंग वेळी बॉबर स्टाईल बाईक ‘पेरक’ देखील सादर केली होती. ही बाईक जुलै 2019 मध्ये लाँच करण्यात येणार होती. मात्र आता या वर्षाच्या अखेर ही बाईक लाँच केली जाईल.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कंपनीच्या जावा आणि जावा 53 बाइक्सच्या तुलनेत पेरकमध्ये अधिक पॉवरफुल 334 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 30 bhp ची पॉवर आणि 31 Nm टॉर्क जेनरेट करते.

(Source)

सांगण्यात येत आहे की, पेरक बाईकच्या लाँचिंगबरोबरच कंपनी जावा ऑफ-रोड व्हेरिएंट आणि स्क्रॅम्बलर व्हेरिएंट लाँच करण्याची शक्यता आहे. 15 नोव्हेंबरला कंपनी या तीन बाईकवरून पडदा हटवेल.

Leave a Comment