सर जडेजाने विरेंद्र सेहवागवर टीका करणारे ते ट्विट केले रिट्विट

विशाखापट्टणम येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 203 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या या विजयाचे अनेक हिरो होते. रोहित शर्माने दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी केली. मयंक अग्रवालने पहिल्या डावात दुहेरी शतक ठोकले. अश्विनने सामन्यात 8 विकेट्स घेतले. तर मोहम्मद शमीने देखील दुसऱ्या डावात 5 विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला. रविंद्र जडेजाने देखील सामन्यात 70 धावा आणि 6 विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागच्या एका ट्विटमुळे जडेजा नाराज झाल्याचे दिसले.

भारताच्या विजयानंतर विरेंद्र सेहवागने खेळाडूंचे कौतूक करणारे एक ट्विट केले. मात्र या ट्विटमध्ये सेहवागने जडेजाचे नाव नव्हते लिहिले. सेहवागने ट्विट केले होते की, रोहित शर्मासाठी जबरदस्त मॅच, कसोटी क्रिकेटमध्ये सलामीसाठी एखाद्या स्वप्नासारखी सुरूवात. त्यांना खुप साऱ्या शुभेच्छा. मयंक, शमी, अश्विन, पुजारा यांचे भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान होते.

सेहवागच्या या ट्विटमध्ये जडेजाचे नाव नसल्याने त्याचे फॅन्स नाराज झाले. अनेक युजर्सनी सेहवागला जडेजाच्या कामगिरीची देखील आठवण करून दिली. यातील एक ट्विट रविंद्र जडेजाने देखील रिट्विट केले. यावरून स्पष्ट होते की, जडेजाला सेहवागचे ट्विट आवडलेले नाही.

जडेजाने रिट्विट केलेल्या बिनित पटेल युजरने ट्विटमध्ये लिहिले होते की, विरेंद्र सेहवाग, काय तुमच्या टिव्हीमध्ये रविंद्र जडेजाची बँटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग परफॉर्म्स दिसली नाही का ? का तुम्ही त्यावेळी झोपला होता ?

Leave a Comment