यांना मिळाला यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार


मुंबई – यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली असून सोमवारी अमेरिकेचे संशोधक विल्यम केलीन ज्युनियर, सर पिटर जे रॅटक्लिफ आणि ब्रिटनचे ग्रेग सेमेन्झा या तिघांना विभागून नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी कोशिकांच्या प्राणवायू ग्रहणावर केलेल्या सखोल संशोधनासाठी त्यांची नोबेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

तिघांनी प्राणवायूची शरीरातील मात्रा ही कशाप्रकारे पेशी, चयापचय क्रिया आणि शारीरिक हालचालींवर परिणाम करते हे आपल्याला समजून घेता यावे यासाठी केलेल्या संशोधनाची आपल्याला नक्की मदत होईल अशी प्रतिक्रिया ज्युरींनी दिली आहे. अॅनिमिया, कॅन्सर आणि इतर आजारांनी लढा देण्यासाठी त्यांनी केलेल्या संशोधनाचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल, असेही ज्युरी म्हणाले.

९,१८,००० डॉलर पुरस्काराची रक्कम म्हणून विल्यम केलीन ज्युनियर, सर पिटर जे रॅटक्लिफ आणि ब्रिटनचे ग्रेग सेमेन्झा या तिघांना देण्यात आली आहे. ही रक्कम तिघांमध्ये विभागली जाणार आहे. १९०१ पासून नोबेल पुरस्कार दिला जात आहे. वैदयकीय क्षेत्रातील हा ११० वा पुरस्कार आहे.

Leave a Comment