तुम्ही पाहिला आहे का ‘निशब्दम’मधील माधवनचा लुक


दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत ‘निशब्दम’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आर. माधवन हा झळकणार आहे. माधवन या चित्रपटात संगीतकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.


आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये माधवनने भूमिका साकारल्या आहेत. त्याची विशेष क्रेझ तरुणाईत पाहिली जाते. अलिकडेच त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा झाला. त्याने चाहत्यांची मने त्याच्या अभिनयाने आणि गोड हास्याने जिंकली आहेत. तो तुमच्या हृदयाला संगीतकाराच्या भूमिकेतही भिडेल, असे निर्मात्यांनी म्हटले आहे.

‘अँथोनी’ या सेलिब्रिटी संगीतकाराची भूमिका ‘निशब्दम’ या चित्रपटात माधवन साकारत आहे. त्याचा हटके लूक पोस्टरमध्येही पाहायला मिळतो. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असणार आहे. अनुष्का शेट्टीसोबत मिशेल मेडसन, अंजली, शालीनी पांडे, सुब्बाराजू आणि श्रीनिवासा अवसरला हे कलाकारही या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. ‘कोना फिल्म कॉर्पोरेशन’ अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, गोपी सुंदर यांनी या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सांभाळली आहे.

Leave a Comment