तुम्ही पाहिला का सैफचा दशानन अवतार ?


सध्या आपल्या आगामी चित्रपटांवर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा लक्ष केंद्रीत आहे. येत्या काळात ‘लाल कप्तान’ या त्याच्या चित्रपटातून असा हा अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर आता या चित्रपटाचे नवा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

नवरात्र, दसरा या दिवसांचे औचित्य ‘एन एच १०’ फेम दिग्दर्शक नवदीप सिंग याच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटाचा नवा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सैफचे दशानन अवतार या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. सैफ साकारत असणाऱ्या पात्राची ही रुपे पाहताना प्रथमदर्शनी धडकीच भरते. पण, खऱ्या अर्थाने हे पोस्टर चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे.


चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत हे पोस्टर सर्वांच्या भेटीला आणले. ज्याची चर्चा सध्या कलाविश्वात पाहायला मिळत आहे. यामध्ये विविध भावमुद्रा असणारा सैफ पाहताना त्याच्या भूमिकेतील बरेच बारकावेही नजरेत येत आहेत.

अगदी डोळ्यांत दिसणारा दाह असो किंवा मग जटाधारी केसांना बांधलेले लाल रंगाचे कापड असो; हे पोस्टर चित्रपटाविषयीचे काही प्रश्न उपस्थित करुन जात आहे. १८ ऑक्टोबरला रिलीज होणाऱ्या या चित्रपटामध्ये सैफ व्यतिरिक्त अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिसुद्धा झळकणार आहे. शिवाय मानव वीज, झोया हुसैन, दीपक डोब्रियाल हे चेहरेही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Leave a Comment