एवढ्या कोटींचे घड्याळ घालून हार्दिक पांड्याने केली शस्त्रक्रिया

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या पाठीच्या सर्जरीमुळे क्रिकेटपासून लांब आहे. असे असले तरी सोशल मीडियावर हार्दिक पांड्याची जोरदार चर्चा आहे.

मागील आठवड्यात लंडनमध्ये पाठीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यावर हार्दिकने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. हार्दिकने हॉस्पिटलमधील बेडवरील त्याचा फोटो शेअर केल्यानंतर फोटो चांगलाच व्हायरल झाला.

अनेक चाहत्यांनी आणि मित्रांनी त्याला लवकर बरा असे म्हटले. गौरव कपूर, सुरेश रैना आणि मयंक अग्रवाल यांनी देखील लवकर बरा असे ट्विट केले.

मात्र हार्दिक पांड्याच्या यशस्वी शस्त्रक्रिये पेक्षाही चाहत्यांचे एका गोष्टीकडे अधिक लक्ष गेले ते म्हणजे त्याच्या हातातील घड्याळाकडे. अनेकांनी त्याला शस्त्रक्रिया करताना घड्याळ घातले होतेस की काय ?, असा देखील प्रश्न विचारला. यावर हार्दिकने देखील ‘हो’ असे उत्तर दिले.

काही युजर्सने तर त्याने कोणते घड्याळ घातले आहे हे देखील शोधून काढले. एका युजर्सने हे घड्याळ पॅटेक फिलिप नॉटिलसचं असल्याचे सांगितले. हार्दिकने घातलेल घड्याळ हे सेल्फ वाइंडिग रोझ गोल्ड नॉटिलस मॉडेलचे 5980 / 1R आणि कॅलिबर CH 28‑520 सी या रेफ्रंस नंबरचे असण्याची शक्यता आहे

या घड्याळासाठी तब्बल 8 वर्ष वाट बघावी लागते. या घड्याळांच्या मॉडेलची किंमत ही कोटींच्या घरात आहे. हार्दिकने घातलेल्या घड्याळाच्या मॉडेलची किंमत तब्बल 13 कोटी एवढी आहे.

Leave a Comment