जुने ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर जाणून घ्या हे नवीन नियम

देशात मोटार वाहन कायदा 2019 लागू झाल्यानंतर ऑक्टोंबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात देखील बदल झाले आहेत. याचबरोबर गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) देखील बदलले आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीचा फॉर्मेट एकसारखाच असेल.

नवीन ड्रायव्हिंग लायसन्समध्ये हे फिचर्स –

नवीन नियमांनुसार, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीमध्ये क्यूआर कोड आणि मायक्रोचिप लावलेली असेल. यामुळे प्रत्येक राज्यातील ड्रायव्हिंग लायसन्स, आरसीचा रंग आणि डिझाईन एक सारखीच असेल. याचबरोबर आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती एकाच ठिकाणी असेल. आधी फॉर्मेट वेगवेगळा असल्याने माहिती वेगवेगळी असायची. क्यूआर कोड आणि चिपमध्ये जुने सर्व रेकॉर्ड असतील.

ड्रायव्हिंग लायसन्सच्या मायक्रोचिप आणि क्यूआर कोडमध्ये तुमची संपुर्ण माहिती असेल. याद्वारे केंद्रीय डाटा बेसमधून ड्रायव्हर अथवा वाहनाबद्दल संपुर्ण माहिती काढता येते. क्यूआर कोड वाचता यावे यासाठी ट्रॅफिक पोलिसांना हँडी ट्रॅकिंग डिव्हाईस देखील दिले जाणार आहे. प्रत्येक ड्रायव्हिंग लायसन्सच्या मागे एक इमर्जेन्सी नंबर लिहिलेला असेल, जेणेकरून गरज पडल्यास पोलिस अथवा अन्य व्यक्ती त्या नंबरवर संपर्क करू शकेल.

याआधी ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी प्रत्येक राज्याचे वेगवेगळे असायचे. त्यामुळे यावरील माहिती काही ठिकाणी पुढील बाजूस छापलेली असे, तर काही ठिकाणी मागील बाजूला छापली जात असे. मात्र नवीन नियमांनुसार ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीची माहिती एक सारखीच एकाच ठिकाणी छापली जाईल.

Leave a Comment