जगात पहिल्यांदाच सापडला दुर्मिळ 80 कोटी वर्षांपुर्वीचा हिऱ्याच्या आत हिरा

जगातील अनेक देशांमध्ये हिऱ्याच्या खाणी आहेत. या खाणींमध्ये छोटे-मोठे हिरे नेहमीच सापडत असतात. मात्र पहिल्यांदाच एखाद्या हिऱ्याच्या आत हिरा सापडल्याची घटना घडली आहे. आजपर्यंत इतिहासात असा हिरा सापडला नव्हता.

(Source)

हा हिरा यकुशियाच्या न्यूरबा खाणीत सापडला आहे. या हिऱ्याबद्दल सांगितले जात आहे की, हा हिरा 80 कोटी वर्षांपुर्वीचा असण्याची शक्यता आहे.

(Source)

रशियाची सायबेरियात खाणकाम करणारी कंपनी पीजेएससीनुसार, या हिऱ्याचे वजन 0.62 कॅरेट आहे. तर या हिऱ्याच्या आतमध्ये 0.2 कॅरेट वजनाचा आणखी एक हिरा आहे.

(Source)

हिऱ्याच्या आत हिरा असल्याने याला रशियाची पारंपारिक बाहुली मॅट्रीओशका सारखे असल्याचे सांगितले जात आहे. या हिऱ्याची किंमत 426 कोटी रूपये सांगण्यात येत आहे.

(Source)

खाणकाम करणारी कंपनी अलरोसाच्या रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट जियॉलॉजिकल एंटरप्राइजचे उपसंचालक ओलेग कोवलचुक यांनी सांगितले की, हिऱ्याच्या आत हिरा सापडणे ही निसर्गाची एक अनोखी रचना आहे.

Leave a Comment