भारतात लाँच झाली Benelli ची सर्वात स्वस्त बाइक लाँच


भारतात आपली नवी बाइक Leoncino 250 बेनेली इंडियाने लाँच केली आहे. या बाइकची एक्स-शोरुम किंमत 2.5 लाख रुपये एवढी आहे. भारतातील इटलीच्या बेनेली कंपनीची ही सर्वात स्वस्त बाइक आहे. अधिकृत संकेतस्थळ आणि डीलरशीप्समध्ये 6,000 रुपयांमध्ये बेनेलीच्या बाइकसाठी बुकिंग स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे.

व्हाइट, ग्रे, रेड आणि ब्राउन अशा चार कलरच्या पर्यायांमध्ये Benelli Leoncino 250 बाइक उपलब्ध आहे. 3 वर्षांची अमर्यादित किलोमीटर वॉरंटी यावर आहे. या बाइकची भारतीय बाजारात स्पर्धा केटीएम ड्यूक 250, महिंद्रा मोजो 300, केटीएम ड्यूक 390 आणि BMW G3 10R यांच्याशी असेल. 249CC क्षमतेचे सिंगल-सिलिंडर लिक्विड कूल्ड मोटर इंजिन बेनेलीच्या या बाइकमध्ये आहे. 25.8 hp ची ऊर्जा आणि 21.2 Nm टॉर्क हे इंजिन निर्माण करते. 6 स्पीड गिअरबॉक्स देखील बाइकमध्ये आहे.

फुल्ली डिजिटल इंस्ट्रुमेंट कंसोल आणि लायटिंगसाठी ऑल-LED सेटअप 12.5 लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी असलेल्या या बाइकमध्ये आहे. उत्तम रोड हँडलिंगसाठी ड्युअल चॅनल ABS असून 280 mm सिंगल डिस्क फ्रंट ब्रेक आहे. तर, mm सिंगल डिस्क रिअर ब्रेक आहे. ब्लॅक्ड-आउट अॅलॉय व्हिल्स असलेल्या या बाइकला ‘नेक्ड स्ट्रीट लूक’ देण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे.

Leave a Comment