पुरातत्वशास्त्रज्ञांना सापडले 5 हजार वर्षांपुर्वीचे शहर

इस्त्रालयाच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी 5000 वर्षांपुर्वीच्या शहराच्या अवशेषांचा शोध लागला असल्याचा दावा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, हे त्याकाळातील सर्वात मोठे शहर होते. जेथे किल्ले, मंदिर आणि कब्रिस्तानची व्यवस्था होती.

इस्त्रालयाच्या पुरातत्व प्राधिकरणाचे अधिकारी पाझ यांनी सांगितले की, आम्हाला येथे विशाल शहराचे अवशेष सापडले आहेत. यामध्ये गल्यांचे मार्ग देखील आढळून आले, जे सार्वजनिक जागा आणि शेजाऱ्यांमध्ये अंतर दर्शवते. हा कांस्य काळातील मोठा शोध असल्याचे त्यांनी सांगितले.

(Source)

ही पुरातत्व साइट इन इसूर म्हणून ओळखली जाते. ही जागा 0.65 स्केअर किलोमीटरमध्ये पसरलेली आहे. येथे पारंपारिक मंदिरांचे अवशेष देखील सापडले असून, याठिकाणी मनुष्य आणि प्राण्यांची दुर्मिळ चित्र बनवण्यात आलेली आहेत. पाज यांनी सांगितले की, सभ्यतेकडे शहरीकरणाचे हे पहिले पाऊल होते.

(Source)

या ठिकाणी 4 मिलियनपेक्षा अधिक तुकडे सापडले आहे, ज्यात मातीची भांडी, अवजार, कुंड्या सापडल्या आहेत. 5 ते 6 हजार लोक शेती आणि व्यवसायासाठी या ठिकाणी राहत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment