येथे सहा महिने अगोदरच होतो रावण वध


देशात सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरु असून त्याची सांगता विजयादशमीच्या दिवशी रावण दहन करून होईल. रावण दहन कार्यक्रमासाठी विविध ठिकाणी जोरदार तयारी सुरु आहे. मध्यप्रदेशातील रतलाम जिल्यात चिकलाना गावाची परंपरा खुपच वेगळी आहे. येथे दसऱ्याला नाही तर त्या अगोदर सहा महिने रावण वध कार्यक्रम केला जातो. येथे रावणाचे दहन केले जात नाही तर त्याचे नाक कापून त्याचा वध केला जातो.

येथे रावणाची दहा तोंडे असलेली सिंहासनारूढ १५ फुटी मूर्ती कायमस्वरूपी गेल्या तीन वर्षापूर्वी बनविली गेली आहे. चैत्री नवरात्रात येथे दशनानाचे नाक कापून त्याचा प्रतीकात्मक अन्त केला जातो. आपल्याकडे एखाद्याचे चारचौघात नाक कापले गेले म्हणजे बदनामी झाली असे मानले जाते. तोच उद्देश येथे आहे. या सोहळ्यात सांप्रदायिक सद्भावाचे अनोखे दर्शन घडते कारण हिंदू बहुल असलेल्या या गावात हिंदू मुस्लीम मिळून हा उत्सव साजरा करतात. ही परंपरा खूप जुनी आहे.

यावेळी ढोल ताश्यांच्या गजरात हनुमान मंदिरापासून मिरवणूक निघते. त्यात राम रावण सेनेची सोंगे घेतली जातात. हनुमान झालेली गावातील प्रतिष्ठित व्यक्ती रावणाच्या नाभीवर तीन वेळा गदा प्रहार करते आणि मग संकेतिक लंका दहन केले जाते. दरवर्षी मातीचा रावण पुतळा तयार केला जातो.

Leave a Comment