साबण, शाम्पू गर्भवती महिलांसाठी धोकादायक

preganacy
बीजिंग : सौंदर्यप्रसाधनांना आधुनिक जगात खूपच महत्त्व आले आहे. मात्र पूर्वी नैसर्गिक साधनांद्वारे बनविल्या जाणा-या सौंदर्यप्रसाधनांचा वापर होत असे. मात्र आता सौंदर्यप्रसाधनांमध्ये हमखास रसायनांचा वापर केला जातो. रासायनिक प्रक्रियाद्वारे तयार करण्यात येणारे साबण, शाम्पू आणि पाकिटबंद पदार्थ गर्भवती महिलांसाठी खूपच धोकादायक असून या रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनांमुळे गर्भपात होण्याची शक्यता असते, असे चीनमधील शास्त्रज्ञांचे मत आहे.

नैसर्गिक गर्भपात झालेल्या ३०० महिलांचा पॅकिंग विद्यापीठातील या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. या बहुतेक महिलांचा गर्भधारणा झाल्यानंतर पाच ते १३ आठवड्यांत गर्भपात झाला होता. या महिलांनी वापरलेल्या सौंदर्यप्रसाधने, पाकिटबंद पदार्थ आणि दैनंदिन वापरातील अन्य साधनांचा अभ्यास करण्यात आला. त्या वापरत असलेल्या साबण, शाम्पू आणि पाकिटबंद पदार्थामध्ये ‘थॅलेट्स’ नावाच्या रसायनाचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. हे रसायन शरीरासाठी धोकादायक असतानाही त्याचा वापर अनेक कंपन्यांकडून केला जात आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment