गोरखनाथ मठातून चालतोय उत्तरप्रदेश सरकारचा कारभार


उत्तरप्रदेश सरकारचा कारभार सध्या किमान पाच दिवस गोरखपूरच्या गोरखनाथ मठातून चालविला जात आहे. कारण गोरखनाथ मंदिर पिठात सध्या नवरात्र सुरु असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या मठाचे पीठाधीश आहेत आणि बुधवार पर्यंत त्यांचा मुक्काम या मंदिरातच राहणार आहे. त्यामुळे सध्या ते मुख्यमंत्रीपदाबरोबरच पीठाधीश्वर जबाबदारीही पार पाडत आहेत. या मठाच्या परंपरेप्रमाणे मठाधिपतीनी या काळात नऊ दिवस मठातच मुक्काम करणे अपेक्षित आहे पण योगी आदित्यनाथ पाच दिवस येथे राहणार आहेत.

शुक्रवारी ते येथे दाखल झाले असून त्यांनी शनिवारी विधिवत पूजा विधान, महानिषा पूजन केले आहे. सोमवारी ते त्यांच्या निवासस्थानी कन्यापूजन करणार आहेत. यावेळी बालिकांचे पाय धुवून ते स्वतः त्यांना भोजन वाढणार आहेत. नवरात्र संपले की विजयादशमीला श्रीनाथांची पूजा करून ते दुपारी तिलक समारोहात सामील होतील आणि ही शोभायात्रा रामलीला मैदानावर जाईल तेव्हा तेथे योगी रामपूजन करतील. सायंकाळी सहभोजनाचा कार्यक्रम आहे तो पार पडल्यावर बुधवारी योगी लखनौला परतणार आहेत.

Leave a Comment