तुमच्या कॉम्प्युटरमधून या गोष्टी करा डिलीट, अन्यथा खाते होईल रिकामे

आज डिजिटल जमान्यात लोक मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि स्मार्टफोनचा वापर करतात. युजर्स या डिव्हाईसमध्ये आपली खाजगी माहिती देखील ठेवतात.

अनेक जण आपल्या डिव्हाईसच्या सिस्टममध्ये क्रेडिट कार्ड सारखी खाजगी माहिती देखील स्टोर करतात. मात्र विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. याचबरोबर युजर्सची माहिती देखील लीक होते. आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींची माहिती देणार आहोत, ज्या तुमच्या लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरमध्ये असेल तर त्वरित डिलिट करा.

(Source)

खाजगी माहिती –

जर तुमच्या लॅपटॉपमध्ये तुमचा मोबाईल नंबर, घरचा पत्ता, जन्म तारीख, तुमचे पुर्ण नाव अशी माहिती असेल तर त्वरित डिलिट करा. कारण तुमच्या या खाजगी माहितीमुळे तुमचे खोटे प्रोफाईल बनवले जाऊ शकते.

(Source)

क्रेडिट कार्डचा नंबर –

जर तुमच्या लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरमध्ये क्रेडिट कार्डचा नंबर असेल तर हॅकर्स तुमची फसवणूक करू शकतात. सर्वसाधारणपणे अनेक युजर्स गुगल क्रोमचा उपयोग करून ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर कार्डाचा पासवर्ड सेव्ह करतात. जर तुम्ही देखील कॉम्प्युटर अथवा क्रोममध्ये पेमेंटची माहिती सेव्ह केली असेल तर त्वरित डिलीट करा. हॅकर्स ही माहिती चोरू शकतात.

(Source)

बँक स्टेटमेंट –

सर्वसाधारणपणे सर्वाचे बँक खाते असते. दर महिन्याला ईमेलवर अकाउंटची माहिती देणारी पीडीएफ फाईल येते. अनेकजण ही फाईल डाउनलोड करतात. मात्र अनेकजण ही फाईल डिव्हाईसमधून डिलीट करत नाही. हँकर्स ही माहिती चोरून तुमचे अकाउंट खाली करू शकतात. त्यामुळे तुमच्या डिव्हाईसमधील ही माहिती त्वरित डिलीट करा.

(Source)

फोटो –

एक फोटो हा एक हजार शब्दांच्या बरोबर असतो. तुमच्या फोटाचा वापर कोणी नोटरीमध्ये वेरिफाई करून खोटे कागदपत्रे तयार करू शकते. त्यामुळे तुमची खाजगी माहिती तुमच्या डिव्हाईसमधून त्वरित डिलीट करा.

Leave a Comment