भर कोर्टात न्यायाधीशाने केला आत्महत्येचा प्रयत्न

थायलंडच्या एका न्यायाधीशाने हत्येतील गुन्ह्यातील आरोपींची सुटका केल्यानंतर खचाखच भरलेल्या न्यायालयातच स्वतःला गोळी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न  केल्याची घटना घडला आहे. न्यायाधीशाने आत्महत्येपुर्वी फेसबुक लाइवद्वारे केलेल्या जोशपुर्ण भाषणात देशातील न्यायप्रणालीची निंदा केली.

टीकाकारांचे म्हणणे आहे की, थायलंडच्या न्यायालय हे धनाढ्य व शक्तीशाली लोकांच्या बाजूने काम करते. तर सर्वसामान्य लोकांना छोट्या गुन्ह्यासाठी त्वरित कठोर शिक्षा देण्यात येते. आतापर्यंत कोणत्याही न्यायाधीशाने न्यायप्रणालीवर टीका केली नव्हती.

दक्षिण थायलंडमधील याला न्यायालयातील न्यायाधीश कनाकोर्न पियानचाना यांनी गोळी घालून हत्या करण्यात आलेल्या एका गुन्ह्यात पाच मुस्लिम आरोपींची निर्दोष सुटका केली व त्यानंतर न्यायालयातचे बंदूक काढून स्वतःच्या छातीत गोळ्या घालून आत्महत्या केली.

आपल्या फोनद्वारे फेसबुक लाईव्ह करत न्यायाधीशांनी कोर्टात म्हटले की, एखाद्याला शिक्षा देण्यासाठी तुमच्याकडे स्पष्ट आणि विश्वसनीय पुरावे असणे गरजेचे आहे. त्यामुळे जर तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही शिक्षा देऊ शकत नाही. मी हे म्हणत नाही की, या पाच आरोपींनी गुन्हा केलेला नाही. कदाचित त्यांनी गुन्हा केलाही असेल. मात्र न्याय प्रक्रिया ही पारदर्शी आणि विश्वास ठेवण्याएवढी योग्य असण्याची गरज आहे. चुकीच्या लोकांना शिक्षा करणे हे त्यांना बळीचे बकरे बनवण्यासारखे आहे.

हे फेसबुक लाईव्ह नंतर हटवण्यात आले. मात्र हे बघणाऱ्यांनी सांगितले की, कनाकोर्न यांनी स्वतःला गोळी मारण्याआधी थायलंडच्या माजी राज्याच्या फोटोसमोर कायद्याची शपथ घेतली.

न्यायालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून, आता धोका टळलेला आहे. तसेच त्यांनी सांगितले की, असे वाटते की, न्यायाधीशांनी खाजगी कारणामुळे स्वतःला गोळी मारून घेतली. या गोष्टीचा तपास केला जाईल. सध्या पाचही आरोपींना कोठडीत ठेवण्यात आलेले आहे.

Leave a Comment