हा माइंड रिडर सूट वापरून चालू शकणार लकवाग्रस्त व्यक्ती

फ्रांसमधील 30 वर्षीय लकवाग्रस्त थिबॉल्ट मेंदू नियंत्रित एग्जोस्केलेटनच्या मदतीने पुन्हा एकदा चालू शकणार आहे. एग्जोस्केलेटन सुट टेक्नोलॉजीमुळे थिबॉल्टला एक नवीन आयुष्य मिळाले आहे. नाइट क्लबमध्ये घडलेल्या एका घटनेनंतर थिबॉल्टचे संपुर्ण शरीर लकवाग्रस्त झाले होते. एखाद्या घटनेमुळे अथवा आजारामुळे अर्धांगवायू झालेल्या व्यक्तींसाठी एग्जोस्केलेटन टेक्नोलॉजी आशेचे किरण आहे.

(Source)

ट्रेटोप्लेजिक अर्थात असे लोक ज्यांचे एखाद्या दुर्घटनेमुळे अथवा आजारामुळे हात-पाय अंशतः अथवा पुर्णपणे काम करणे बंद करतात. त्यांना अर्धांगवायू होतो. थिबॉल्टला एग्जोस्केलेटनचा वापर करणे शिकण्यासाठी अनेक महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये कोणतीही क्रिया करण्यासाठी मेंदूद्वारे संकेत दिले जातात.

(Source)

हे परिक्षण करणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितले की, या उपकरणाचा वापर सार्वजनिक प्रयोग म्हणून करण्यासाठी अजून वेळ आहे. मात्र त्यांनी सांगितले की, यामुळे लकवाग्रस्तांच्या जीवनाचे स्वरूप सुधारण्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे.

(Source)

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, 65 किलोंचा हा एग्जोस्केलेटन सुट पुर्णपणे कार्य करण्यास सक्षम नाही. मात्र सामान्य शरीराच्या विचारांच्या आधारावर शरीराच्या भागांची हालचाल करण्यास मदत करते. याचे एडवांस्ड व्हर्जन पुर्णपणे कार्य करण्यास सक्षम असेल.

(सौजन्य – 5 न्यूज)

एग्जोस्केलेटनला नियंत्रित करण्यासाठी थिबॉल्टच्या मेंदूमध्ये दोन इंप्लांट करण्यात आले आहेत. जे हालचाल नियंत्रित करणाऱ्या मेंदूमधील भागाला कव्हर करते. मेंदूमध्ये लावण्यात आलेले इंप्लांट मेंदूद्वारे सुचना कॉम्प्यूटरला पाठवतात. कॉम्प्यूटर सॉफ्टवेअर ब्रेनवेव वाचून, एग्जोस्केलेटनला सुचना देते व चालण्यास निर्देश करते.

Leave a Comment