निधनाच्या अफवेवर या क्रिकेटपटूने दिले स्पष्टीकरण

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद नबी मागील महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चर्चेत होता. मात्र मोहम्मद नबी पुन्हा एकदा एका गंभीर कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर काही अफगाणिस्तानी मीडिया आउटलेटकडून क्रिकेटर मोहम्मद नबीचा हार्ट अटॅकमुळे निधन झाल्याचे खोटी माहिती पसरवण्यात येत होती. ही माहिती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

ही खोटी बातमी पसरल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सराव सामन्यातील मोहमम्म नबीचे काही फोटो देखील शेअर केले. या फोटोवरून मोहम्मद नबी जिंवत असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर स्वतः मोहम्मद नबीने आपल्या निधनाचे वृत्त खोटे असल्याचे ट्विट केले. नबीने ट्विट केले की, मित्रांनो, मी अगदी व्यवस्थित आहे. काही मीडिया आउटलेटकडून माझ्या निधनाचे वृत्त पसरवले जात आहे ते खोटे आहे. धन्यवाद.

मोहम्मद नबीच्या ट्विटनंतर दुःखी झालेल्या अफगाणिस्तानच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल.

 

Leave a Comment