स्वप्नात बघितले आणि दुसऱ्या दिवशी लागला 23 कोटींचा जॅकपॉट

कधीही दुबईला भेट न दिलेल्या एका भारतीय व्यक्तीला चक्क 12 मिलियन दिरहम (23 कोटी रूपये) ची बिग तिकिट लॉटरी लागली आहे. कर्नाटकच्या मंगळुरू येथेली 24 वर्षीय मोहम्मद फयाज एका रात्रीत कोट्याधीश झाला आहे. तो सध्या मुंबईमध्ये अकाउंटटची नोकरी करतो. 6 महिन्यांपुर्वीच त्याने आपल्या मित्राबरोबर लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यास सुरूवात केली होती.

फयाजने सांगितले की, एक दिवस आधीच त्याने स्वप्न बघितले होते की, त्याला जॅकपॉट लागला आहे आणि दुसऱ्या दिवशी अबुधाबीवरून त्याला लॉटरी लागल्याचा फोन आला. बिग तिकिटच्या आयोजकांनी सांगितले की, लॉटरी लागल्याची माहिती देण्यासाठी फयाजला 4 वेळा कॉल करण्यात आला मात्र त्याने फोन उचलला नाही. पण जेव्हा पाचव्या कॉल केल्यावर फयाजने फोन उचलला तेव्हा त्याला स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता.

फयाजला कधीही दुबईला जाण्याची संधी मिळाली नाही. त्याने सप्टेंबरमध्ये लॉटरीचे तिकिट खरेदी केली होती.

एवढ्या पैशांचे काय करणार असे विचारल्यावर फयाजने सांगितले की, सध्या मी त्याबद्दल काहीही विचार केला नाही. या पैशांचा वापर भावाच्या शिक्षणासाठी करेल. त्याचबरोबर विकलेली जमीन पुन्हा खरेदी करेल. घराची दुरूस्ती करेल. याशिवाय काही रक्कम दान देखील करेल.  मला कधीही युएईला जाण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र पुढील महिन्यात चेक घेण्यासाठी मी युएईला जाणार आहे.

Leave a Comment