टिकटॉकला टक्कर देण्यासाठी गुगल खरेदी करणार हे अ‍ॅप

लहानांपासून ते छोट्यापर्यंत सर्वांना टिकटॉकची क्रेझ आहे. यामुळे या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्या देखील नवी अ‍ॅप बाजारात लाँच करत आहे. आता टिकटॉकला टक्कर देण्यासाठी सर्च इंजिन कंपनी गुगल देखील लवकरच नवीन अ‍ॅप लाँच करणार आहे. रिपोर्टनुसार, कंपनी लवकरच अमेरिकेतील सोशल मीडिया व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप फायरवर्क विकत घेणार आहे.

गुगलबरोबरच चीनी कंपनी वाईबो देखील फायरवर्क अ‍ॅप खरेदी करण्याचा विचार करत आहे. मात्र गुगल हे अ‍ॅप खरेदी करण्याच्या बाबतीत इतर कंपनीच्या तुलनेत अधिक पुढे आहे.

फायरवर्क अ‍ॅप भारतीय बाजारात मागील महिन्यातच लाँच झाले आहे. तेव्हा या अ‍ॅपची फंड रेजिंग जवळपास 100 मिलियन डॉलर होती. तर दुसरीकडे टिकटॉकची किंमत 75 मिलियन होती. लूप नाउ टेक्नोलॉजीने फायरवर्क अ‍ॅप बनवले आहे.

फायरवर्क आपल्या युजर्सला व्हिडीओ बनवण्यासाठी 30 सेंकद देते, तर टिकटॉकवर युजर्सला 15 सेंकद मिळतात. याचबरोबर युजर्स फायरवर्कमध्ये वर्टिकल आणि हॉरिजॉन्टल व्हिडीओ शूट करू शकतील. कंपनीने या फिचरला Revail असे नाव दिले आहे. सध्या फायरवर्कचे 10 लाख युजर्स आहेत.

Leave a Comment