खुशखबर ! आता केबलधारकांना 130 रूपयांमध्ये पाहता येणार एवढे चॅनेल्स

ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन (AIDCF) ने ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एआयडीसीएफने चॅनेक पॅकच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकाना आता केवळ 130 रूपयांमध्ये 150 टिव्ही चॅनेल बघायला मिळणार आहे. याआधी ट्रायने टेरिफ प्लॅनमध्ये बदल केले होते, त्यानंतर चॅनेल पॅकच्या किंमतीत वाढ झाली होती.

एआयडीसीएफने टिव्ही स्बस्क्रायबर्सना फायदा पोहचवण्यासाठी चॅनेल पॅकच्या किंमतीत बदल केला आहे. आता ग्राहकांना 130 रूपयांमध्ये 150 चॅनेल बघायला मिळतील. याआधी केवळ 100 चॅनेल बघायला मिळत असे.

याआधी युजर्सला 100 पेक्षा अधिक चॅनेल्स बघण्यासाठी 20 रूपये अतिरिक्त द्यावे लागत असे. याचबरोबर जीएसटी देखील अतिरिक्त द्यावा लागत असे. तर दुसरीकडे डीटीएच युजर्सला या पॅकसाठी थोडे दिवस वाट बघावी लागणार आहे.

या वर्षाच्या सुरूवातीला डीटीएच आणि केबल नेटवर्कच्या ग्राहकांच्या टेरिफ प्लॅनमध्ये बदल केले होते. या प्लॅनमुळे किंमती वाढल्या होत्या.

Leave a Comment