मध्यप्रदेशमध्ये राहिले 5 देशांवर लक्ष ठेवणारे हे पक्षी

मंगोलियाचे वैज्ञानिक 20 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रवासाचा मार्ग, त्यांचा व्यवहार आणि दिनचर्या जाणून घेण्यासाठी अभ्यास करत आहेत. या पक्ष्यांमध्ये ओरिएंटल कुकू पक्ष्याचा देखील समावेश आहे. वैज्ञानिकांनी कुकू पक्ष्याचा प्रवास जाणून घेण्यासाठी त्यांच्या शरीरावर सेटेलाईट टॅग देखील लावले आहेत. जेणेकरून त्यांच्या लोकेशनची माहिती मिळेल. यावर्षी 5 ते 8 जून दरम्यान या पक्ष्यांना टॅग लावून सोडण्यात आले होते. या प्रोजेक्टमध्ये इंडोनेशिया/मलेशिया, आफ्रीका, ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंडचा समावेश होतो.

यामधील दोन पक्ष्यांनी भारतात देखील प्रवेश केला होतो. दोघांनी हजारो किलोमीटरचा प्रवास 24 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या काळात पुर्ण केला. ऑनऑन नावाच्या या पक्ष्याने भारत-नेपाळ सीमेवरून उड्डाण घेतली होती. 7 सप्टेंबरला ऑनऑन ग्वालियरमध्ये होता. तर नमजा नावाचा कुकू पक्षी बुंदेलखंड जिल्ह्यात दिसला. दोघांच्यामध्ये 230 किलोमीटरचे अंतर होते.

टॅगची किंमत 10 ते 12 लाख रूपये –

टॅगमधून मिळणाऱ्या सिग्नलद्वारे वेबसाइटवर पक्ष्यांचे लोकेशन ट्रेस केले जात आहे. 10 ते 12 लाख रूपये किंमतीचा हा टॅग दिवसातून केवळ एकदा ब्लिंक करतो. टॅगमध्ये मिनी सोलर पॅनेल, सेटेलाईट डाटा आहे. त्याद्वारे समजते की, पक्षी या वेळी कोठे आहे.

वैज्ञानिकांनी सांगितले की, पक्ष्यांना लावण्यात आलेल्या टॅगमध्ये कॅमेरा नसतो. केवळ लोकेशनबद्दल माहिती मिळते.

 

Leave a Comment