विंग कमांडर अभिनंदन यांच्या 51 स्क्वाड्रनचा वायुदलाकडून होणार सन्मान

बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचा भारतीय वायुदलातर्फे प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. वर्थमान यांच्या 51 स्क्वाड्रनचा वायुदलाचे अध्यक्ष आरकेएस भदौरिया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला चोख प्रत्युतर देणे आणि पाकिस्तानचे एफ-16 लढाऊ विमान पाडण्याची कामगिरी स्कवाड्रन 51चे विंग कमांडर अभिनंदन यांनी केली होती. त्यांच्यातर्फे हा पुरस्कार कमांडिग ऑफिसर ग्रुप कॅप्टन सतीश पवार स्विकारतील.

याचबरोबर नंबर 9 स्कवाड्रन ज्यात मिराज 2000 लढाऊ विमानने 26 फेब्रुवारीला ऑपरेशन बंदर अंतर्गत बालाकोट एअर स्ट्राईक केले होते. या स्क्वाड्रनचा देखील सन्मान केला जाणार आहे. याचबरोबर 601 सिग्नल युनिटच्या मिंटी अग्रवाल यांच्या बालाकोट हवाई हल्ल्यातील योगदानाबद्दल त्यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave a Comment