सापडले 10 हजार वर्षांपुर्वीच्या प्राण्याचे बुलेट प्रुफ कवच

आजपासून हजारो वर्षांपुर्वी पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव-जंतू, विशालकाय प्राणी राहत होते. या प्रत्येक प्राण्यांचे काहीतरी वैशिष्ट्य असे. हे प्राणी आता लुप्त झाले असले तरी, त्यांचे अवशेष सापडतात, जे आपल्यामध्ये त्यांच्याबद्दल कुतुहल निर्माण करते. अशाच एका लुप्त झालेल्या विशालकाय प्राण्याचे बुलेट प्रुफ सुरक्षा कवच सापडले आहे. हे सुरक्षा कवच 10 हजार वर्ष जुने असल्याचे सांगितले जात आहे.

(Source)

अर्जेंटिनाच्या ग्रेटर ब्यूनस आयर्स येथील बॅरियो ला फ्लेचा येथे मच्छिमारांना एका प्राण्याचे बुलेट प्रुफ सुरक्षा कवच सापडले आहे. हे सुरक्षा कवच अनेक वर्ष रेतीमध्ये दबलेले होते. हे सुरक्षा कवच ग्लाइप्टोडॉन्ट प्रजातीच्या प्राण्याचे असल्याचे सांगितले जात आहे.

(Source)

हजारो वर्षांपुर्वी ग्लोइप्टोडॉन्ट प्रजातीचे प्राणी दक्षिण अमेरिकेत आढळत असे. त्यांच्या शरीरावर मजबूत गोल आकाराचे सुरक्षा कवच असे.

(Source)

वर्ष 2016 मध्ये जीव विज्ञानाचे एक संशोधन प्रकाशित झाले होते. त्यानुसार, ग्लाइप्टोडॉन्ट दक्षिण अमेरिकेत लाखो वर्षांपुर्वी अस्तित्वात आले होते. चार पायांच्या या प्राण्याच्या चारही बाजूंना हाडांनी निर्मिती झालेले एक मजबूत सुरक्षा कवच होते. या सुरक्षा कवचाची जाडी दोन इंच होती.

(Source)

सांगण्यात येते की, ग्लाइप्टोडॉनची लांबी जवळपास 11 फूट आणि वजन 2000 किलो होते. हे प्राणी सध्या अस्तित्वात असलेल्या आर्मडिलोचे पूर्वज आहेत. जे किडे आणि झाडे खातात.

(Source)

रिपोर्टनुसार, 2015 मध्ये देखील याच भागात जोस एंटोनिया निवास नावाच्या शेतकऱ्याला ग्लाइप्टोडॉनचे बुलेट प्रुफ सुरक्षा कवच सापडले होते. तेव्हा त्याने याला डायनोसॉरचे अंडे समजले होते. त्यानंतर वैज्ञानिकांनी तपासणीनंतर हे ग्लाइप्टोडॉन्टचे सल्याचे सांगितले होते

 

Leave a Comment