संगीत ऐका मानसिक तणाव कमी करा

music
चॉकलेट-कॉफीचे सेवन करणे, संगीत ऐकणे आणि ध्यानधारणा करणे यासारख्या सवयी अनेक आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता कमी करतात. जाणून घेऊया या सवयी शास्त्रीयदृष्ट्या आरोग्यासाठी कशा फायदेशीर ठरू शकतात.

संगीत : मॅकगिल विद्यापीठाच्या न्यूरोसायंटिस्टच्या मते, संगीत ऐकल्याने डोपामाइन हार्मोन सक्रिय होतो. हा हार्मोन तणाव घालवणे आणि मूड चांगला करण्यासाठी खूफ गरजेचा आहे. संशोधनादरम्यान संगीत ऐकणा-यांचा ब्रेन स्कॅन करण्यात आला होता. त्यामध्ये संगीत ऐकल्यानंतर न्यूरोकेमिकल्सची सक्रियता वाढत असल्याचे तज्ज्ञांना आढळून आले.

ध्यानधारणा : नियमितपणे ध्यानधारणा करणे सुद्धा तणाव घालवण्याची चांगली पद्धत आहे. यामुळे मूडही चांगला राहतो. तज्ज्ञांच्या मते, ध्यानधारणा केल्याने वायफळ चिंता आणि नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते. ही पद्धत एखाद्या अँटिडिप्रेसेंटच्या रूपात काम करते. तसेच यामुळे एकाग्रताही वाढते आणि तणाव घालवण्यासाठी आवश्यक असलेली मन:शांतीही मिळते.

लहानपण : कोणत्याही मुलाच्या लहानपणावरच त्याचे भविष्य अवलंबून असते. सुमारे एक हजार मुलांवर एक संशोधन करण्यात आले. यामध्ये मुले युवावस्थेत येईपयर्ंत त्यांचे अवलोकन करणे कायम ठेवण्यात आले होते. मुलांच्या पालन-पोषणाचा परिणाम युवावस्थेतही जाणवतो, असे त्यात आढळून आले. ज्या मुलांचे पालन-पोषण चांगल्या प्रकारे होते ती मुले तरुणावस्थेत अधिक निरोगी, आनंदी आणि स्व-नियंत्रित होतात. तसेच ज्या मुलांना टास्क पूर्ण करण्यास त्रास होतो किंवा चिडचिड करतात अशा मुलांचे वजन वाढते. तसेच त्यांचे औषधांवर अवलंबून राहण्याचे प्रमाणही वाढते, असेही संशोधनात आढळले.

चॉकलेट : मेंदू आणि हृदयासाठी चॉकलेट फायदेशीर आहे. ब्रिटिश संशोधकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चॉकलेटचे सेवन करणा-या सुमारे एक लाख लोकांवर संशोधन केले. चॉकलेट कार्डियोवेस्क्युलर आजारापासून बचाव करण्यासाठी 37 टक्के आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी 29 टक्के फायदेशीर असल्याचे या संशोधनात आढळले. चॉकलेटच्या अँटिऑक्सिडंट प्रॉपर्टीने तणाव नियंत्रणात राहतो. तसेच यामुळे हृदयावर अनावश्यक दबाव पडत नाही.

कॉफी : कॉफीच्या सेवनाने सुद्धा तणाव नियंत्रित राहतो. जे लोक नियमितपणे कॉफीचे सेवन करतात ते तणावग्रस्त असण्याची शक्यता 20 टक्क्यांनी कमी होते, असे हॉर्वर्ड विद्यापीठातर्फे करण्यात आलेल्या एका संशोधनातून आढळले. तसेच जे लोक क्वचितच कॉफी पितात किंवा पीत नाहीत, अशा लोकांमध्येही शक्यता जास्त असते, असेही आढळून आले. तज्ज्ञांच्या मते, कॉफीत असलेल्या
कॅफीनमुळे न्यूरोट्रान्समीटरची सक्रियता वाढते आणि हिरड्याही मजबूत होतात. मर्यादित प्रमाणात कॉफी पिण्याचा नियम पाळल्याने मेंदूच्या कार्यप्रणालीला दीर्घकालीन फायदा पोहोचतो.

फळे/भाज्या : फळे आणि भाज्यांचे भरपूर सेवन केल्याने स्ट्रोकचा धोका कमी केला जाऊ शकतो, असे एका डच संशोधनात आढळले. संशोधकाच्या मते ज्या फळ किंवा भाज्यांचा आतील भाग हल या रंगाचा असतो अशा फळ-भाज्या जसे काकडी, पत्ताकोबी आणि केळीचे सेवन केल्याने स्ट्रोकची शक्यता 50 टक्क्यांपयर्ंत कमी होऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment