व्यायामापासून जरा सावध

excersies
व्यायामाच्या बाबतीत अंध:श्रद्धाच फार आहेत. आपण एखादा विशिष्ट व्यायाम केला की, आपल्या आयुष्यात आरोग्याच्या बाबतीत सुखच सुख निर्माण होईल आणि आपल्याला काहीच होणार नाही ही एक सकारात्मक अंध:श्रद्धा एका बाजूला आहे तर दुसर्‍या बाजूला व्यायामाच्या बाबतीत कमालीचे गैरसमज आहेत. व्यायाम केला तर तो नियमानुसारच केला पाहिजे, नियमितच केला पाहिजे नाही तर शरीराचे भारी नुकसान होते अशी नकारात्मक अंध:श्रद्धा दुसर्‍या बाजूला आहे. पण वस्तुस्थिती दोन्हींच्या मध्ये आहे.

व्यायामाने प्रकृती चांगली राहते, परंतु व्यायाम करताना काही चुका झाल्या तर व्यायामाचा उपयोग होत नाही आणि काही तरी अपाय होण्याची मात्र शक्यता असते. याबाबतीत सावध राहिले पाहिजे. आपण व्यायाम केला की, काही काळ शरीराला थकवा जाणवतो. हा काही मोठा प्रश्‍न नाही. मात्र तसा थकवा जाणवला तर घाबरून जाता कामा नये. व्यायामानंतर शरीराला थोडी विश्रांती दिली पाहिजे आणि गरज पडल्यास थोडा वेळ पडून राहून चहाचा एखादा कप घेतला पाहिजे.

व्यायामाच्या बाबतीत जाणवणारे असे परिणाम हे शरीराच्या क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम घेतल्याने जाणवत असतात. तेव्हा आपल्या शरीराची क्षमता किती आणि आपण किती व्यायाम घेतला पाहिजे याचे काही एक मोजमाप आपण ठरवले पाहिजे. जेवढा व्यायाम केल्याने आपल्याला फार थकल्यासारखे वाटते तेवढा व्यायाम म्हणजे मर्यादेबाहेरचा व्यायाम आहे असे लक्षात घेऊन त्या व्यायामाचे प्रमाण थोडे कमी केले पाहिजे. काही वेळा जिममध्ये वजन उचलणे, वजन ओढणे असे व्यायाम केले जातात. तिथेही किती वजन उचलावे आणि किती ओढावे याचा तिथल्या शिक्षकांशी चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment