रंगाला अनुसरुन करा मेकअप

makeup
गोऱ्या रंगासाठी : आपला रंग गोरा असेल तर ती निसर्गाकडून मिळालेली उत्तम देणगी आहे. पण जर गोरा असूनही आपला रंग काहीसा दबल्यासारखा वाटत असेल तर त्यावरही उपाय आहे. त्यात चमक आणण्यासाठी पीच वा शियर ब्रांझ ब्लशर लावायला हेवा. तो नैसर्गिक रंगात राखू इच्छित असाल तर पेल पिंक रंगाची शेडही सोबत लावा. डोळ्यांना नेव्ही ब्ल्यू, सिल्व्हर ग्रे, सॉफट पेस्टल, लायलॅक, स्काय ब्ल्यू, वा टेराकोटा रंग खूफ शोभेल. तसेच न्यूड, बेबी पिंक, रोझी ब्राऊन व शिअर रोड लिपस्टिक वापरायला हवी.

गडद रंगाच्या त्वचेसाठी : ब्लशरमध्ये डीफ प्लम, डार्क रोझ वा करेंट लावावे. डोळ्यांच्या सौंदर्यासाठी ब्राऊन मॅट, गोल्ड ब्रांझ वा सिल्व्हरची शिमरी शेड लावावी. लिपस्टिकसाठी ब्लॅक बेरी, पिच, डीफ रेड, पर्पल, कॅरेमल यापैकी कोणताही रंग निवडू शकता.

पिवळ्या रंगाची त्वचा : या त्वचेवर लाल वा नारंगी रंगाचा वापर करु नये. ब्राऊनिश रोझ वा कोको ब्राऊन, डीफ पर्पल वा मिडलाईट ब्ल्यऊआयशॅडो वापरावा. ओठ सुंदर दिसण्यासाठी रोझी बेझ, डीफ रेड वा शियर ब्राऊन यापैकी काहीही लावू शकतात.

गव्हाळ त्वचेसाठी : या रंगाची रंगत वाढविण्यासाठी रोझ शेड वा म्यूटेड टाऊनी ब्लशर वापरावा. ऑरेंज बेस कधीही लावऊनये. डोळ्यांसाठी अर्थ टेन शेड म्हणजेच डार्क ग्रे, बेझ, मशरुम शेड वापरू शकता. ओठ नॅचरल दिसण्यासाठी शियर वा बेरी टिंटेड ग्लास लावावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment