युवावर्गाला त्रासतोय मधुमेह

daibates
मधुमेह रोग चिवट मानला जातो. कारण एकदा का हा रोग झाला की जन्माची सोबत करतो. मात्र याला नियंत्रणात ठेवून आनंदाने जगता येते.
मधुमेह असणार्यांनी भाजलेले धान्य, जव, चणे, कच्चे टोमॅटो, जांभळाची बी, कारले, आवळा, लिंबू, मेथी हे पदार्थ नेहमी खाल्ले पाहिजेत. ज्यांच्या आई-वडिलांना मधुमेह असतो त्यांनी या विकाराबाबत नेहमी सावध रहावे व शरीर तपासणी करुन घ्यावी. रक्त तपासून त्यातले शर्कराचे प्रमाण पहावे. मिठाचे व साखरेचे सेवन कमी करावे.

अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, अंगूर खाल्ल्याने मधुमेह व हृदयविकार नियंत्रणात राहतो. मिशिगन विर्श्वविद्यालयाचे शरीर चिकित्सक म्हणतात की, नियमित फळे खाल्ल्यामुळे रक्तदाब व मधुमेहाचा धोका कमी होतो.

मधुमेह असणार्यांनी आपले वजन नियंत्रणात ठेवावे. जेव्हा आपले शरीर काही कारणाने इन्सुलीन बनवण्याचे कार्य कमी करते तेव्हा शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि बघता बघता माणूस मधुमेहाचा रुग्ण बनतो. एकाएकी चक्कर येते आणि माणू स दवाखान्यात पोहोचतो. डॉक्टर वयाचा अंदाज घेऊन रक्त तपासून घ्या असे सुचवतात. रक्त तपासणीत साखर वाढलेली असते व मग मधुमेहाचे निदान होते. आई-वडील- आजोबा यापैकी कोणालाही मधुमेह असेल तर त्यांच्या वारसदारांनी वेळोवेळी रक्त तपासणी करुन घ्यावी व सावध रहावे म्हणजे मधुमेहाचा शिरकाव शरीरात होणार नाही.

पूर्वी मधुमेह चाळिशीच्या वयोगटात दिसायचा. आता तो तरुण वयातील मुला-मुलींतही दिसू लागला आहे. आधुनिक जीवनशैली, कष्टकमी व सुखाची अपेक्षा या कारणाने मधुमेह होत आहे. भारतात याचे रुग्ण काळजी करण्याइतपत वाढले आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment