…तर आणखी बिघडू शकते तब्येत

body-pain
वेदनेकडे दुर्लक्ष करणे किंवा मनानेच वेदनाशामकांचे सेवन करणे हा काही समस्येवरील उपाय नाही. तज्ज्ञांच्या मते, असा बेजबाबदारपणा पीडितासाठी धोकादायक ठरू शकतो. शरीराच्या कोणत्याही भागास वेदना झाल्यामुळे दिवसभराच्या कार्यपद्धतीवर परिणाम होतो. याशिवाय स्नायू कमकुवत आणि आखडण्याबरोबरच इतर गंभीर समस्यांना निमंत्रण मिळू शकते. लोक नेहमीच व्यग्र असल्याने अशा काही चुका करतात, ज्यामुळे पीडिताची स्थिती आणखी बिघडू शकते.

खिन्न राहणे : खिन्न राहणा-या लोकांपैकी केवळ एक-तृतीयांश लोकच अँटीडिप्रेसेंट (डिप्रेशनमध्ये घेतले जाणारे औषध) घेतात, असे एका संशोधनात आढळले आहे. अभ्यासात सामील झालेल्या लोकांचे ब्रेन स्कॅन करण्यात आले. भावनात्मक उलथापालथ वेदना आणखी वाढवू शकते, असे त्यात आढळले. 54 टक्के लोक तणावग्रस्त राहिल्याने पाठदुखीनेही पीडित असतात.

काय करावे? : झोफ येत नाही, उदासवाणे वाटते, वजन वेगाने वाढते किंवा घटते ही लक्षणे तुमच्यात आढळत असतील तर तुम्ही डिप्रेशनने (खिन्नता) पीडित आहात. अशा वेळी तातडीने डॉक्टरशी संपर्क करा. तो तुम्हाला अँटीडिप्रेसेंट, काँगनिटिव्ह बिहेव्हिएरल थेरपी (सीबीटी) किंवा दोन्ही घेण्याचा सल्ला देऊ शकतो. सीबीटीमध्ये पीडित व्यक्तीस वेदनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मानसिकदृष्ट्या कणखर राहण्याचे प्रशिक्षण दिले.

व्यायाम न करणे : ज्या लोकांच्या दैनंदिन कार्यक्रमात व्यायामाचा समावेश नाही, त्यांना नेहमीच शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागात वेदनेची समस्या उद्भवते. व्यायामामुळे स्नायू बळकट होतात आणि सांध्यांची लवचीकता टिकून राहते. तसेच त्यामुळे एंडोर्फिन हार्मोनची सक्रियताही वाढते, जो मन:स्थिती चांगली करण्यात फायदेशीर ठरतो. गाठी व आर्थरायटिसने पीडित व्यक्तीच्या सांध्याची सूज कमी करण्यातही हे हार्मोन उपयुक्त आहे.

काय करावे? : व्यायामास एकदम सुरुवात करू नका. हळूहळू त्यास सुरुवात करा. उदा. 5-10 मिनिटे चालावे. त्यामुळे सांध्यांची सक्रियता कायम राहील आणि त्यात वेदना किंवा आखडण्याची समस्या मिटेल.

गांभीर्याने न घेणे : एका संशोधनानुसार, चारपैकी एक पीडित वेदनेकडे दुर्लक्ष करतो आणि जवळपास सहा महिने उपचारास टाळाटाळ करतो. ’अमेरिकन पेन सोसायटी‘नुसार, बहुतेक लोक वेदना झाल्यानंतर डॉक्टरकडे जात नाहीत. त्याउलट
ते मनानेच वेदनाशामकांचे सेवन करतात.

काय करावे? : वेदनेकडे बिल्कुल कानाडोळा करू नका. एका संशोधनानुसार, तीव्र वेदनेमुळे पीडित खिन्नतेलाही बळी पडू शकतो. तसेच त्याच्या मेंदूचा आकारही कमी होऊ शकतो. पाठदुखीने त्रस्त असलेल्या 26 लोकांवर वर्षभर केलेल्या अध्ययनात असे आढळले की, त्यांच्या मेंदूच्या 5 ते 11 टक्केपेशींची हानी झाली होती.

हृदयरोग : दातांमध्ये असलेले जीवाणू च हिरड्यांच्या संसर्गास कारणीभूत असतात. दातांच्या योग्य स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास हृदयास धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, अशा वेळी अर्थेस्क्लेरॉसिसची शक्यता असते. हा एका प्रकारचा हृदयरोग असून, त्यात पीडिताच्या धमण्यांची लवचीकता कमी होते. ’अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नल सर्क्युलेशन‘मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात म्हटले आहे की, ज्यांना हिरड्यांचे निगडित विकार असतात, त्यांच्या दातात असलेले जीवाणू हिरड्यांच्या माध्यमातून रक्तवाहिन्यांमध्ये सहज प्रवेश करतात आणि फॅटी प्लाकची (दातावरील कीट) निर्मिती करू लागतात. त्यामुळे वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.

पचनाची समस्या : तोंडात अनेक रसायनांच्या अभिक्रियांसोबत पचन प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आतड्यांना जास्त मेहनत करावी लागते. अशावेळी अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पचनाशी निगडित विविध विकार होण्याची शक्यता वाढते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment