या महिलेने चक्क टॉयलेट पेपरने बनवला लग्नाचा ड्रेस


जगात विविध विचित्र स्पर्धा आयोजित केल्या जातात. कुठेतरी थोबाड फोडणे स्पर्धा आयोजित केली जाते, तर कुठेतरी महिला उंच टाचांच्या सँडल घालून धावतात. अशीच एक विचित्र स्पर्धा न्यूयॉर्कमध्येही आयोजित करण्यात आली होती, जिथे लग्नाचा ड्रेस चक्क टॉयलेट पेपरचा होता.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सुरुवातीला एकूण 15०० सहभागी झाले होते, परंतु 30 सप्टेंबर रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली, ज्यामध्ये केवळ दहा सहभागी निवडले गेले. या स्पर्धेत दक्षिण कॅरोलिनाच्या मिमोझा हस्काला विजयी म्हणून निवडले गेले.

या स्पर्धेत लग्नाचा ड्रेस बनवण्यासाठी टॉयलेट पेपरसह टेप, धागा व गोंद वापरण्यात आले. मिमोझा हस्काने एकूण 48 रोल्स टॉयलेट पेपरचा वापर करुन लग्नाचा ड्रेस तयार केला, जो सर्वात नेत्रदीपक घोषित करण्यात आला. लग्नाचा हा ड्रेस बनवण्यासाठी मिमोझाला एकूण 400 तास लागले.

मिमोझा हस्का यांना विजयी म्हणून एकूण सात लाख रुपये देण्यात आले. या स्पर्धेत जज म्हणून अनेक नामांकित व्यक्ती होते. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा कार्यक्रम अमेरिकेच्या नॅशनल टीव्हीवर देखील प्रसारित केले गेले.

Leave a Comment