पुण्यात भाजपचा हा उमेदवार आहे सर्वात श्रीमंत


पुणे – एकूण ६३ उमेदवार पुण्यातील आठ मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यातीच भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार जगदीश मुळीक हे श्रीमंत आमदारांपैकी एक ठरले आहेत. १४७. ६२ कोटी एवढी त्यांची संपत्ती आहे.

प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती वडगाव शेरीचे आमदार असलेल्या मुळीक यांनी जाहीर केली आहे. २०१४ मध्ये मुळीक यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती ही १०१ कोटी होती. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत ४६ कोटींची वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती आता ही १४७ कोटी असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

त्यांच्या जंगम मालमत्तेत घट झाली असून त्यांची जंगम मालमत्ता ही २०१४ साली १०.७० कोटी होती. आता ती ३.२० कोटींवर आली आहे. तर गेल्या पाच वर्षांत स्थावर मालमत्ता ही ९१.०६ कोटींवरून १४४ कोटींवर पोहोचली आहे.

माझी ९५ % मालमत्ता ही माझ्या आई- वडिलांच्या मालकीची आहे. माझ्या मालमत्तेत वाढ झाली नाही, मात्र गेल्या पाच वर्षांत रेडी रेकनर दरात आणि बाजार भावमुल्यात वाढ झाली असल्यामुळे आजच्या भावाप्रमाणे मालमत्तेच्या किमती असल्याचे मुळीक म्हणाले. मुळीक यांच्यानंतर पुण्यातील श्रीमंत उमेदवारांच्या यादीत भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८८.८४ कोटी आहे.

Leave a Comment