290 लोकांना एचआयव्ही संक्रमित करणाऱ्याची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने ठेवली कायम


कंबोडियाच्या सर्वोच्च न्यायालयाने विनापरवाना दुकान थाटणाऱ्या डॉक्टरला खालच्या न्यायालयाच्या 25 वर्षांच्या तुरूंगवासाच्या शिक्षेचा निर्णय कायम ठेवला आहे. या डॉक्टरांमुळे 200 हून अधिक लोकांना एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती आहे. रक्त तपासणीनंतर अनेक रूग्णांना एचआयव्हीची लागण होण्याची पुष्टी झाल्याची माहिती सिन्हुआने शनिवारी दिली. यानंतर डॉ. येम क्रेन (वय 60) यांना 2014 मध्ये बट्टांबांग प्रांतातून अटक केली गेली.

डॉक्टर क्रीनवर असा आरोप आहे की तो अनेकवेळा एकाच इंजेक्शनचा वापर करत होता. ज्यामुळे अनेकांना एचआयव्हीची लागण झाली. डिसेंबर 2015 मध्ये बट्टामबांग प्रांत न्यायालयाने या प्रकरणात येमला दोषी ठरवले आणि त्याला 25 वर्षांची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर न्यायालयाने तक्रारी नोंदवणाऱ्या 100 पेक्षा जास्त पीडितांना 500-3000 डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने त्याला दिले.

सप्टेंबर 2017मध्ये अपील न्यायालयाने बट्टामबांग प्रांत न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवले. शुक्रवारी ही शिक्षा देताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नील नोल म्हणाले की, येम क्रिनवरील अपील न्यायालयाचा निर्णय योग्य असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तो कायम ठेवला आहे. त्याने आपली चूक मान्य करून तुरुंगवासाची शिक्षा कमी करून दहा वर्ष करण्याची विनंती केली होती.

न्यायालयासमोर दोषी डॉक्टरने कबूल केले की नवीन इंजेक्शन आणणे कठीण असल्याने अनेक रुग्णांवर त्याने एकच इंजेक्शन अनेकदा वापरले. या घटनेने बट्टामबांग प्रांतातील ग्रामीण रोका समाजातील जवळपास 290 लोकांना एचआयव्हीची लागण झाली.

Leave a Comment